कंधार प्रतिनिधी (माधव गोटमवाड)
महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यात पोलीस भरती सुरू आहे.यामध्ये नांदेड जिल्ह्यात सुध्दा पोलिस भरती राबविण्यात येत आहे.नांदेड जिल्हा पोलीस भरती चे निकाल हे जाहीर झाले आहेत .
या पोलीस भरती मध्ये संपुर्ण नांदेड जिल्ह्यात पहिला येणा-या मुलाला मिळणार बुलेट आणि पहिला येणा-या मुलीला मिळणार स्कुटी असे मुंडे करियर अकॅडमी चे मार्गदर्शक तथा संचालक वाय. टी.मुंडे सर यांनी जाहीर केले होते .
दिलेल्या शब्दानुसार / वचनानुसार म्हणतात ना “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले” – ही म्हण शंभर टक्के मुंडे सर यांना लागू होते . “जे बोलले आहे त्या प्रमाणे त्यांनी करून दाखवले आहे. त्याचे कौतुक करावेच लागेल ” त्यांनी जिल्ह्यात पहिला आलेला विद्यार्थी गुरुनाथ गोटमवाड याला बुलेट दिली .
याबाबत अधिक बोलताना गुरुनाथ ने सांगितले की, घरची परिस्थिती अतिशय कठीण असताना ही खडतर मेहनत घेत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. मोठ्या भावाचे ,आजोबांचे व मामाचे मार्गदर्शक असून या यशात कुटुंबाचा व मुंडे करियर अकॅडमी चे संचालक वाय . टी.मुंडे सर चा मोठा वाटा असल्याचे गुरुनाथ गोटमवाड यांनी सांगितले.
2018 मध्ये झालेल्या नांदेड पोलीस भरती मध्ये सुद्धा मुंडे करिअर अकॅडमी चे विद्यार्थी एकनाथ घुगे नांदेड जिल्हात सर्वप्रथम आला होता.
सलग दोन पोलीस भरती मध्ये दोन वेळा नांदेड जिल्ह्यात पहिला येण्याची ऐतिहासिक कामगिरी मुंडे करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवली आहे व मुंडे करियर अकॅडमीची जिल्ह्यात पहिला येण्याची परंपरा कायम राखली आहे .
याप्रमाणेच लातूर जिल्ह्यात दशरथ केंद्रे हा लेखी परीक्षेत पहिला आला. यवतमाळ जिल्ह्यात क्लासेसची विद्यार्थिनी विठाई केंद्रे हिने पण लेखी परीक्षेत पहिला येण्याची कामगिरी केली.
नागपूर ग्रामीण पोलीस भरती मध्ये भागवत गुट्टे व ज्ञानोबा केंद्रे यांनी समान गुण घेऊन लेखी परीक्षेत जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला.
मुंडे करिअर अकॅडमीचे विद्यार्थी गंगाधर तेलंग यांनी गोंदिया जिल्ह्यात लेखी परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला.
आतापर्यंत आलेल्या निकालानुसार मुंडे करियर अकॅडमीच्या पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीमध्ये यश संपादन केले आहे. मुंबई पोलीस व चालक परीक्षा बाकी असून या सर्व जिल्ह्यांचे निकाल आल्यास मुंडे करिअर अकॅडमी चे दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी होण्याची जास्त शक्यता आहे . मुंडे करिअर अकॅडमी फक्त तालुक्यापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक झालेली अकॅडमी आहे.
याचे संपूर्ण श्रेय मुंडे करिअर अकॅडमी चे शिक्षकवृंद यांना जाते .
– काही दिवसांपूर्वी माझ्या तालुक्याला कंधार आणि अंधार म्हटले जायचे पण आज माझा तालुका संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वाधिक पोलीस असलेला तालुका बनलेला आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आज मुंडे करिअर अकॅडमी ही तालुक्याचा इतिहास बदलणारी अकॅडमी ठरली आहे आणि यापुढेही 2018 व 2023 प्रमाणे पुढील भरती मध्ये नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक साधण्याचा आम्ही जोरदार प्रयत्न करणार असे वाय . टी.मुंडे सर म्हणाले.
*वाय . टी.मुंडे सर