प्रत्येक ऋतूचं सौंदर्य वेगळं आणि त्यातून उन्हात तळपुन जेव्हा निसर्ग विविध रंगांची उधळण करतो ना तेव्हा आपण त्यापुढे किती शुल्लक आहोत याची जाणीव होते.. पुण्याच्या आसपास म्हणण्यापेक्षा माझ्या एरीयाच्या तासाभरात अनेक उत्तम ठिकाणे आहे.. जिथे ३- ४ तास फिरुन आलो की व्यायाम ,लिखाण , वाचन याला हुरूप येतो..मन प्रसन्न होतं ..
काल संध्याकाळी पानशेतला जाताना स्वागत केले ते निलमोहर ने.. काय ती निळाई .. त्याच्या रंगाला आपल्या रंगाचा स्पर्श होवु नये म्हणुन की काय हे साहेब कायम उंचीवर..उंच झाड सुंदर लव्हेंडर कलरची फुले सांगत होती..सोनल लांबूनच रील कर गं..
थोडी पुढे गेले तर गुलमोहर आमची वाट पहात होता.. लालचुटुक फुले त्या झाडाची सावली आणि खाली पडलेला फुलांचा सडा तिथुन हलुच नये असं वाटत होतं.. त्याचे आभार मानत पुढे निघालो तर पिवळ्या रंगाचे घुंगराळलेले घड पाहिले आणि आम्ही त्याच्यावर तुटुन पडलो.. रील केले ,फोटो काढले ..बहावा फुलण्याची मी वर्षभर वाट पहाते.. कवेत घेत त्याला म्हटलं , कीती सुंदर आहेस पण तुझं सौंदर्य दाखवायला तुला उन्हात उभं रहावं लागतं ना ?? .. तो हसला आणि म्हणाला , हेच तर जीवन आहे.. दुसऱ्याला आनंद द्यायला आपल्याला थोडा त्रास सहन करावाच लागतो..
उजव्या हाताला पानशेत धरणाचे बॅकवॉटर आणि थोडे डावीकडे शेवरी माझी वाट पहात होती.. लांबून पाहिले तर तिच्याजवळ कोणीही फोटो काढेना.. ती माझी वाट पहात उन्हात उभी होती..शेंगाना चिकटलेला मउ पांढराशुभ्र कापूस गोळा केला . ऱील केले .. शेवरीला कवेत घ्यायची इच्छा होती पण झाड मोठे होते .. अनेक रंगात भिजताना शेवटी शेवरीने दाखवून दिले पांढरा रंग कशातही सामावु शकतो त्याच रंगाने अनेक रंग तयार होतात.. तिला सॅल्युट केलं आणि म्हणाले , जे युनीक आहे त्याची किम्मत कळत नाही. मस्त वाऱ्यावर कापूस सैरावैरा फिरत होता कारण सोनल तिच्यावर काहीतरी लिहीणार हे तिला माहीत होतं..
पाण्याशेजारी बसुन मनसोक्त निसर्गाची कृतज्ञता व्यक्त केली मित्रांनो छोट्या गोष्टीत आनंद घ्या आणि सगळ्यासोबत जरुर शेअर करा..
सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री
83800 87262