कंधार ; प्रतिनिधी
अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आणि गाराच्या मार्याने कंधार तालुक्यात शेतकरी व सर्व सामान्यांचे नुकसान झाले तर बिजेवाडी व लालवाडी येथे वीज पडल्याने बैल आणि म्हैस दगावली.गारपीटीने आंबा,जांभुळ,केळी व भाजीपाला उत्पादकावर संक्रांत ओढवली .
कंधार व परिसरात दि.२५ एप्रिल २०२३ च्या भर दुपारी सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.पाहता-पाहता अवकाळी पावसाने जोर धरला.विजेने कडकडाट करुन बीजेवाडी येथील दिगंबर बापुराव लुंगारे यांनी दुग्धव्यवसाय करण्यासाठी घेतलेली नविनच पण शेतात बांधलेली म्हैस विज पडल्याने मृत्युंमुखी पडली.आणि लालवाडी येथील शेतकरी दादाराव कुभांरगावे यांचा बैल विज पडल्याने मृत्यूमुखी पडल्याने तो शेतकरी राजा दु:खाश्रू ढाळत हंबरडा फोडतो आहे.
युवराज लूंगारे या तरुण शेतकऱ्यांने केशर आंबा लागवड केली होती त्यास यंदा आंबे लकाटले होते.पण सोसाट्याचा वारा अन् गारांचा मारा लागल्याने आंबा चे नुकसान झाले .
वादळ वाऱ्यासह गारपीट झाली.त्यात मेठ्यात मोठी गार २० ग्रॅमची होती.तर छोट्य्-मोठ्या गारांचा तुफानी वर्षाव झाला .
हाता-तोंडाशी आलेला आंबा केळी , जांभुळाचे नुकसान झाले तर बहाद्दरपुऱा येथित हातावर पोट असणाऱ्या भाजी-पाला उत्पादक माळी व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बालाजी शिवराज पेठकर यांचे नुकसान झाले .
आस्मानी संकटाने कंधार पंचक्रोशीतील अनेक खेड्या-पाड्यात शेतकऱ्यांच्या कष्टाची वाट लागल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.या आस्मानी संकटा सापडलेल्या शेतक त्यांना शासनाने त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई देऊन या संकटाचा सामना करण्यासाठी हिंमत शासनाने द्यावी.अशी मागणी आता जोर धरत आहे.