कंधार : धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हाच्या उपाध्यक्षपदी मा. गणेश किशनराव पाटील यांची निवड करण्यात आल्याचे धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक व अध्यक्षमा.मनोज(रामेश्वर)विष्णुपंत सिराम यांनी पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन निवड झाल्याचे घोषित केले. कंधार तालुक्यातील वरवंट या गावी पाटील कुटूंबात जन्मलेलाउच्चशिक्षित तरुण सदैव समाज सेवेसाठी तत्पर व धडाडीने काम करणारे ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देणारा कार्यकर्ता म्हणून मा. गणेश किशनराव पाटीलयांची ओळख. त्यांचा या समाजसेवेची तत्परता पाहून धनगर समाज युवा मल्हार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक व अध्यक्ष मनोज रामेश्वर विष्णुपंतसिराम यांनी दखल घेत धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदीनिवड करून तसे पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दिलेल्या नियुक्ती पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, समाजाच्या हितासाठी आपण सदैव तत्पर रहावे व वरिष्ठांनी दिलेले सर्व कार्यक्रम नियमित व प्रामाणिकपणे करणे आपले संघटना प्रमुख संस्थापक वरिष्ठांना विश्वासात घेऊन संघटनेची प्रतिमा उंचावण्यासाठी संघटना वाढविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशिल राहावे व पुढील कार्यास धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मा.गणेश पाटील वरवंटकर यांचे अभिनंदन करुन स्वागत करण्यात आले.त्यांच्या निवडीबद्दल मा. अण्णासाहेब खेमनर प्रदेशाध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेनाप्रकाश भैया सोनसळे धनगर समाज युवा मल्हार सेना नांदेड जिल्हाध्यक्ष मा.शिवाजी होळकर मा. बालाजी नारे सरचिटणीस युवा मल्हार सेना म.रा मा.बालाजी काकडे (म.रा.प्रसिद्धीप्रमुख) मा.नवनाथ काकडे(जिल्हा सरचिटणीस) मा.सुरनर दिगंबर( युवक जिल्हाध्यक्ष) मा.संजय खटके( जिल्हा संपर्क प्रमुख) तसेच सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील असंख्य अशा मित्रपरिवाराने मा.गणेश किशनराव पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या… |