सृष्टीसखा पाऊस…!

      धुंद पावसाचा आलाप…आसुसलेल्या धरतीची आर्त साद.सृजनाचा कोवळा हुंकार…रंगगंधाचा अलौकीक जादुगार.विरह भावनांना गोंजावणारा,

ओल्या आठवणींना जागवणारा.पाहाटेच्या मदहोश वातावरणात प्राजक्त,कदंब,जाई-जुई अन मोहक चाफ्याला वेडावणारा अलबेला पाऊस…!

अगंणातल्या मोग-याला गुजगोष्टी करत भूलवणारा.अबोलीलाही बोलत करणारा,तीच्या रंगात स्वता;ला रंगवणारा पाऊस.पहिल्या श्रावण सरींने भेंडी,पडवळ,दोडका हळूहळू फुलातून अलवार बाहेर डोकावू पाहातात.

पावसातील हि हिरवाईची गौळण हिरव्यापाचूचा साजशृंगार करुन सौद्यर्यांची मुक्त उधळण करते.त्यावेळी इवल्या इवल्या जलबिंदूच्या माध्यमातून सूर्याच्या सप्तरंगाचे अनुपम दर्शन दृष्टिला सुखावते.

असा हा सौंदर्यमग्न पाऊस रुपगंधात चिंब भिजतांना निसर्गाला हिरवाईचे दान भरभरुन देतो…पानांची कोवळीक सळसळ पाऊस.अद्भभुत निसर्गलावण्य म्हणजे पाऊस..

.पाऊस हिरवा,पाऊस मंतरलेला,पाऊस बावरलेला,पाऊस नभातून मनसोक्त ओघळलेला,पाऊस म्हणजे….

पक्ष्यांचे मनोहारी प्रणयी भावनेओतपोत भरलेले प्रणयी कुंजन!सा-या वातरणाचा एक अनामिक आतुरता पाऊस भारतो.खरचं,पाऊस म्हणजे मदमस्त फूलांचा बहर..

.पाऊस म्हणजे नवचैतन्यांचा  मूक्त वावर…!   

            पाऊस म्हणजे,डोंगर माथ्यावरची हिरवाईची नवलाई…क्षितिजावरची निळ्या जांभळसर रंगाची दाटी…

रानफूलांचा गंधमाळून पाऊस शहारतो,गंधाळतो,तनामनाला पुलकीत करतो.पाऊस…

तरुणाईला प्रितीचे पंख बहाल करत,त्यांच्यावर अमृतमय जलाचा शिडकाव करतो.रंगगंधात सजलेल्या रानाला पाऊस सरीने तरारी भरतो.

पाखरांच्या प्रणयी साधनेला  माणिक मोत्यांनी ,कणाकणात नवंचैतन्यं  ओतून पानाफुलांनी सजवतो…म्हणूनच हा ऋतू सर्वांना आवडतो…

डोळ्यात साठवून ठेवावासा वाटतो.इवल्या इवल्या तृणपात्याची पिवळी कात झटकून त्याला हरितवस्त्र परिधान करावयास भाग पाडतो…शेत शिवार नवचैतन्यांन डौलू लागतात…

शेतकरी बांधवांच्या चेह-यावर आनंद ओंसडून वाहातो…खरचं,पाऊस म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग….!

अश्या या मदभ-या पावसाच स्वागत करण्यासाठी हिरवेकंच डोंगर सजतात.भिजलेल्या रानावनात हिरवाईची झूल मन शहारवते…हे सौदर्यं न्याहाळतांना देहभान विसरतं…

एक वेगळीच झिंग तना मनावर चढते.टप…टप थेंबांची नक्षी झाडाच्या पानावर उमटते…क्षितिजावर काळ्याकुट्ट मेघांच महानाट्य चालू होतं…

भन्नाट रानपाऊस,ती चिखलवाट तुडवतांना मातीचा अलौकीक गंधात  पाऊस आपल्या पाऊलखुणा धरतीच्या अंगाखांद्यावर ऊमटवतो.”रानफुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा”पाहून क्षणभर भासत,पावसाच्या स्वागतात्सव हा एवढा साजशृंगार सृष्टिने केलेला आहे.

इवलीशी गोंडस रानफूल न्हाळतांना मन भरत नाही,त्यामध्ये कुडा,करर्टुल,बाभळीची सोनरंगाची इवलीशी फूल,पिवळी,जांभळी,पांढरी कोरांटी,कदंब,मेंदीची जांभळी छोटी छोटी

फूलं,निसुर्डी,तेरडा,कुर्ड,देवचरोट्याची मनभावन फूल,गोवकर्णाचा ऐटबाज तोरा पाहातांना भन भरत….विविधरंगी फुलांची रंगरंगिली दुनिया रानावनात पावसाच्या स्वागतास्तव सज्ज आहे.

आकर्षक फुलांचा ताटवा अथंरुन.असा हा हळवा,अबोध,सर्वांना प्रफूल्लित करणारा  मनभावन,सखा साजन पाऊस…मला खूप आवडतो.मनाच्या कोंदणात त्याची विविध रुप साठवून ठेवतांना मनाला नवतजेला मीळतो.

असा हा पाऊस प्रत्येकाच्याच मनात  कायम बरसतो…कधी आश्रूरुपाने तर कधी मूकभावनेने आपलस करत…

जीवनजगण्याचा मूलमंत्र देत…प्रेमीजणांना विरहात तरसवतो तर कधी त्यांच्या मिलनाचा दुवा देखिल बनतो…म्हनूच पाऊस सर्वांना आवडतो.अश्या या पावसाचे स्वागत करण्यासाठी सृष्टीने अंगभर  नवचैतन्यांचा साज परिधान केला आहे…

पावसाच्या पदकमलांनी सुख समृध्दि आणि भरभराटीची ऊधळणं होओ एवढीच मनोकामना…!

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य

९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *