मराठा महासंग्राम संघटनेचे गांधीगिरी आंदोलन खड्ड्यात बेसनाचे झाडे लावून महापालिकेचा निषेध…


नांदेड  : 

नांदेड शहरातील विविध रस्त्यावर तसेच मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे शहरातील शहरवासीयांना आपण शहरात राहतो की ग्रामीण भागात हे एक कळेनाशे कोडे पडले आहे त्यामुळे मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने नांदेड शहरातील व शहरातील मुख्य रस्त्यावरील तात्काळ खड्डे बसवण्याचे निवेदन मनपाचे आयुक्त यांना दिनांक १८.७.२०२० रोजी देण्यात आले होते

तरीही शहरातील कुठल्याही मुख्य रस्त्यावरील नांदेड महापालिकेने आतापर्यंत खड्डे बुजवलेले नाहीत तर अनेक खड्ड्यामध्ये फक्त गीती टाकून खड्डे बुजवणे चालू असल्यामुळे त्या गिटीवरून  मोटर सायकल स्लीप होऊन अनेक छोटे-मोठे दररोजचे अपघात होत

आहेत त्यासाठी मराठा महासंग्राम संघटनेने वेळोवेळी मागणी करूनही शहरातील महानगरपालिकेने खड्डे न भुजवल्यामुळे बाफना उड्डाणपुलावरील खड्ड्याची पूजा करून खड्ड्याला पुष्पहार व खड्ड्यात बेसर माझी झाडे लावतात नांदेड शहर वाघाळा  महापालिकेचा निषेध करत

मराठा महासंग्राम संघटनेने गांधीगिरी आंदोलन करत  कुंभकर्णी झोपेत असलेल्या नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आले बाफना उड्डाणपुलाचे काम गुरु-ता-गद्दी च्या काळात करण्यात आले होते पण या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे

या फुलाला तीन ठिकाणी मोठमोठे तडे गेले आहेत त्यामुळे हा फुल केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही त्यामुळे त्या फुलाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी व  नांदेड शहरा अंतर्गत असलेल्या रस्त्यावरील तात्काळ खड्डे बुजवण्यात यावेत यासाठी

मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने नांदेड शहर वाघाळा महापालिकेतील अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत शहरातील पडलेल्या खड्यावर पुष्पहार घालून त्या खड्ड्याचे स्वागत करत वर बेसनाचे झाडे लावून

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला नांदेड शहरातील शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा जुना मोंढा ते बर्की चौक जुना कौठा ते वजीराबाद चौरस्ता रेल्वे स्टेशन ते हिंगोली गेट अशा अनेक मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असताना देखील महानगरपालिका झोपेचं सोंग घेऊन बघण्याची भूमिका घेत आहे

नांदेड शहरातील थातूरमातूर पद्धतीने रस्त्यावर फक्त मुरूम टाकून खड्डे बुजवले जात आहेत त्यामुळे नांदेड शहरातील नागरिकांना ग्रामीण भागात राहतो की काय अशी अवस्था नांदेड शहरातील जनतेची झाली आहे त्यामुळे नांदेड शहरात चांगल्या दर्जाचे रस्ते महानगरपालिका केव्हा देणार असे

नांदेड शहरातील जनता बोलून दाखवत आहे नांदेड शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी नांदेड शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे नांदेड शहरातील तात्काळ  डांबरीकरण करत खड्डे भरून रस्ते दुरुस्त करण्यात यावे अन्यथा यानंतर

मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन महानगरपालिकेसमोर करणार असल्याचे मराठा महासंग्राम संघटनेचे नांदेड व हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी म्हटले आहे

यावेळी विक्रम पाटील बामणीकर नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख नांदेड ,ओम पाटील शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड बजरंग पाटील हुंडे ,नागोराव पाटील बोकारे ,विक्रांत पाटील बोकारे ,देवीदास पाटील जाधव, हनुमंत पाटील जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *