कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयाचे मोठया प्रमाणामध्ये भेंगा पडुन पुतळ्याचा काही भाग गळुन पडलेले आहे. व पुतळा मोडकळीस आलेले आहे .
त्यामुळे पुतळ्याची दुरुस्ती करुन पुतळ्याचे सुशोभीकरणे गरजेचे असून दि. १४ मे २०२३ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून त्या पूर्वी पृतळ्याची दुरुस्ती व सुशोभीरण करावे. अन्यथा समाजाच्या भावना तिव्र असून जयंतीच्या अगोदर दि.. १२ मे २०२३ रोजी पर्यंत जर पुतळयाची दुरुस्ती व सुशोभीकरण न केल्यास दि. १३ मे २०२३ रोजी तिव्र 2023 आंदोलन आपल्या कार्यालयासमोर सर्व शिवप्रेमीच्या वतीने करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे .
यावेळी उपस्थित बळिराम पाटील पवार मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष नितीन पाटील कोकाटे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष कंधार विकास पाटील लूगारे संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष कंधार कृष्णा गोटमवाड संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष कंधार व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .