अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान

कंधार ; हनमंत मुसळे

कंधार तालुक्यात 25 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता प्रचंड मेघगर्जना व वादळी वा-यासह गाराचा पाऊस झाला असुन जवळपास १ तास तालुक्याच्या काही भागात पाऊस झाला वीज पडून दोन जनावरे दगावली व आंबा, हाळद, टमाटे व इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

दि. 25 एप्रिल 2023 रोजीच्या वादळी वा-यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हाडोळी (ब्र.) येथील शेतकरी रामदास केशव केंद्रे यांच्या गट क्रं. 38 मधील 2 एकर मधील सर्व टमाटे या पिकाचे नुकसान झाले असुन टमाटे लावण्यापासुन आज पर्यत 3 लाख रुपये खर्च केला व ते पैसे कर्ज घेतले होते काही दिवसापुर्वी कंपनीचे कर्मचारी ही फुललेली टमाटा बाग पाहण्यासाठी आले होते त्यांनी 15 लाख रुपयाचे उत्पन्न होणार असे सांगितले होते.

 

वादव वा-यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सर्व पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.

अधिच कर्ज बाजारी झालेले शेतकरी त्यात भर उन्हाळ्यात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उभ्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या सर्व पिकाचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *