मुखेड: (दादाराव आगलावे)…
येथील योग शिक्षक गणेश टेंभूर्णे व आदर्श शिक्षीका सौ.संगीता टेंभुर्णे यांचे चिरंजीव अमेयादित्य गणेश टेंबुर्णे याने बालवैज्ञानिक म्हूणन सुवर्ण पदक पटकावले.
विज्ञान प्रसार व प्रचाराचे कार्य गेली चार दशके निरंतर चालू ठेवणाऱ्या बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 2022-23 च्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी एस्. एन्. डी. टी. विद्यापिठ पाटकर सभागृह चर्चगेट, मुंबई येथे संपन्न झाला. अथक परिश्रमाने आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर पदक तालिकेपर्यंत पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रेसिडेंट स्टीम अकॅडमी न्युक्लीर सायन्टीस्ट बीएआरसी, डॉ. ए.पी. जयरामन व प्रमुख अतिथी म्हणून व्हीजेटीआयचे आसीस्टंट प्रोफेसर डॉ. विनोद सुर्यवंशी, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. नंदिनी देशमुख या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. मुखेडचा भूमिपुत्र व सध्या नांदेड येथे किड्स किंग्डम पब्लिक स्कूल येथे शिकणारा अमेयादित्य गणेश टेंबुर्णे याने बालवैज्ञानिक म्हूणन सुवर्ण पदक पटकावले. हे यश संपादन करताना अमेयादित्याने लेखी, प्रात्यक्षिक व त्या नंतर “ईटीपी मॉनिटरिंग सिस्टम” म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून कारखाण्यातून निघणारे वेस्ट वॉटर नदीत मुसळून नद्या प्रदूषित होऊ नयेत या विषयावर कृतीवर आधारीत शोध निबंध सादर केला होता. मुंबई येथे त्याची या विषयावर मुलाखत यशस्वी रीत्या पार पडून परीक्षेसाठी बसलेल्या ५५ हजार ८४० विध्यार्थ्यांन पैकीं सुवर्ण पदकासाठी इ. 9 वीच्या वर्गासाठी निवडण्यात आलेल्या केवळ पहिल्या २१ मध्ये स्थानं प्राप्त केले आहे. त्या मुळे बालवैज्ञानिक म्हणून अमेयादित्यला सुवर्ण पदक, प्रमाणपत्र व रु. 3 हजार रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या दिमाखदार सोहळ्यासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक उपस्थित होते.
अमेयादित्यच्या या यशाबद्दल त्याचे प्रमुख मार्गदर्शक भार्गव करिअर अकॅडमी चे भार्गव राजे सर, माध्यमिक शिक्षण विभाग चे शिक्षण अधिकारी सुभाष दिग्रसकर साहेबांनी रु. 50५ हजाराचा धनादेश देऊन गौरव केला. मुखेड चे प्रसिद्ध सर्परोग तज्ञ् डॉ. दिलीप पुंडे, हृदयरोग तज्ञ् डॉ. अशोक कौरवर, दंतरोग तज्ञ सतीश बच्चेवार, प्रा. संजीव डोईबोळे, प्रा.गांजरे सर तसेंच गुरुदेव विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका रणवीरक मॅडम, रणवीरक सर,चंद्रशेखर स्वामी, नंदकुमार काचावर, बस्वराज निर्णे सर तसेंच अनेक मान्यवरांच्या हस्ते अमेयादित्यवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.