कंधार ;
कंधार शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे बिल मागील अनेक महिन्यांपासून रखडले आहेत.सद्य परिस्थिती बेताची असून कोव्हीड १९ च्या संकटामुळे लोकांच्या हाताला रोजगार नाही.परंतु नगरपालीकेच्या अंतर्गत असणाऱ्या लाभार्थांची तात्काळ बिले तात्काळ काढण्याची मागणी दि.१ सप्टेंबर रोजी संयुक्त – ग्रुप च्या वतिने मुख्याधिकारी न.पा.यांना करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे बिल निघत नसल्याने शहरातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे राहण्याची गैरसोय होत आहे अनेक लाभार्थी हे भाड्याने राहत आहेत त्यामुळे न.पा.मुख्याधिकारी यांनी रखडलेले बिल लवकरात लवकर पास करून रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करावी साईनाथ भगवानराव मळगे संयुक्त – ग्रुप संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.