कंधार ; ( म . सिंकदर )
कंधार येथे दुर्गादास सराफ प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्ह च्या संयुक्त विद्यमानाने पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कंधार येथे करण्यात आले होते या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून दै सामनाचे संपादक शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे उपस्थित होते.या कार्यक्रमांचे अध्यक्ष शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे एकनाथ दादा पवार यांची उपस्थिती होती .
गेल्यावीस वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत असलेले शिवसैनिक व दैनिक सामन्याचे पत्रकार गणेश कुंटेवार यांच्या निवासस्थानी पत्रकारांच्या जेवनाची व खासदार संजय राऊत यांच्या सह सर्व मान्यवरांच्या जेवनाची व्यवस्था केली होती परंतू शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी सदर कार्यक्रम शिवसेनेचा आहे असे दाखवत हायजॅक केला त्यामुळे पक्षातील गटबाजी पुन्हा एखदा संजय राऊत यांच्या व्यासपिठावर दिसून आली , त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा भाभांबले , शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या वर्तनामुळे कंधार लोहा येथिल पत्रकार व सच्चे शिवसैनिक मात्र दुखावले गेल्याची चर्चा दबक्या आवाजात होती .बबन थोरात यांच्या सारख्या कार्यकर्त्यामुळे लोहा कंधार मतदार संघात शिवसेना विखुरली गेली आहे .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्कार स्टेट न्युज महाराष्ट्र tvचे संपादक विलास आठवले यांना तर बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा भूषण पत्रकारिता पुरस्कार लोकपत्रचे संपादक रवींद्र तहकीक , यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील १६ पत्रकाराला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . यावेळी कार्यक्रमास माजी आमदार ईश्वरराव भोसीकर , अड मुक्तेश्वर राव धोंडगे , शहाजी नळगे , शिवा नरंगले , यांच्यासह कंधार लोहा तालुक्यातील शिवसैनिक व नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिती होती .