मनोविकास विद्यालय कंधार येथील विद्यार्थ्यांचे एस एस सी परीक्षेत घवघवीत यश

कंधार ; प्रतिनिधी

एस एस सी परीक्षा मार्च 2023 घेण्यात आलेल्या   परीक्षेत मनोविकास विद्यालय कंधार येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश  प्राप्त केले असुन याच विद्यालयाचा विद्यार्थी शेख अब्रार खलील अहमद  हा 99.4 टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम आला  असून गणितात पैकीच्या पैकी 100 पैकी 100 गुण घेतले. मनोविकास विद्यालयाचा एकूण निकाल 96.9% आहे 109विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे व 19विद्यार्थ्यानी 90%पेक्षा जास्त गुण घेतले आहेत या सर्व यशवंत,गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक ,अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष  श्री  पुलकुंडवारसाहेब ,उपाध्यक्ष श्री मुखेडकरसाहेब,सचिन श्री मामडेसाहेब,सदस्य श्री कोळनुरकरसाहेब,कोषाध्यक्ष श्री विकास बीडवईसाहेब,मुख्याध्यापिका सौ.पतंगे,उपमुख्याध्यापक बंडेवार, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक विकासाला शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *