जेलसी असावी पण तीही सकारात्मक.

माझं बरचसं लिखाण हे अनुभवलेलं किवा निरीक्षण केलेलं असतं.. आज असाच एक रिअल किस्सा शेअर करणार आहे..
खरं तर कालची संध्याकाळ ही f. C. ऱोडवर फक्या मारण्यासाठी ठेवली होती.. विंडो शॉपिंग असलं तरीही चालतं पण भटकायला कायम आवडतं कारण बऱ्याचदा माझ्यातील लेखक अशा ठिकाणी घडतो..
माझा मित्र रोहन व्यावसायिक आहे आणि त्याची बायको संगीता घर सांभाळते.. काल त्याचा फोन आला , सोनल भेटायचय .. आहेस ना घरी ?? .. त्याला म्हटलं अरे एफसीला जाणार आहे.. सोनल तुझा प्लॅन कॅंसल कर प्लीज. मी लगेच हो म्हटलं.. तासाभराने त्याला घरापाशी भेटले.. सोबत त्याची बायको होती , जिला मी एक दोनदा भेटले होते .. तिला पाहिल्यावर मनात म्हटलं ही संगीताच आहे ना ?? वजनदार बाई इतकी स्लीम कशी झाली ??.. तिने मला हग करुन Thanks म्हणाली.. रोहन ने कॉफी ऑर्डर केली आणि दोघे एकमेकांकडे पाहु लागले..
मी म्हटलं , रोहन काय झालय ?? .. संगीता सोबत येणार हे तु मला बोलला नाहीस.. आणि काय गं संगीता तु कुठलं डाएट करतेस ?? सुंदर दिसत आहेस असं मी म्हटल्यावर ती म्हणाली , * सोनल डाएट * .. मी म्हटलं , तुम्ही दोघे काही प्लॅन करुन आलाय का??.. त्यावर ती म्हणाली , तुमच्यावर जेलस होवुन मी स्वतःला बदलवलं.. एकदा रोहन मला बोलला होता , अगं सोनल संगीता संशय घेते पण मी त्याच्या बोलण्याकडे फार लक्ष दिलं नव्हतं.. ती लगेचच बोलली ,यांच्या सोबतचे तुमचे फोटो पाहिले आणि मला तुमचा आणि ह्यांचा राग आला , मला वाटलं तुमच्या दोघांचं काहीतरी आहे.. मला हसु आवरेना.. मला हसताना पाहुन तेही दोघे खोटं खोटं हसु लागले.. आज मी तुमचे आभार मानायला आले कारण माझा थायरॉइड आणि बीपी दोन्ही गेलं याचं कारण होतं , विनाकारण तुमचा घेतलेला स्ट्रेस आणि वाढलेलं वजन..
माझे डोळे भरुन आले.. मी काहीच बोलले नाही.. फक्त तिला म्हटलं , तुमची मेहनत आहे आणि अशाच रहा..
मला तिचा प्रामाणिकपणा आवडला.. रोहनच नाही तर इतर पुरूष हे माझे मित्रच आहेत पण त्यांच्या बायका अशा जेलस होवुन स्वतःला घडवणार असतील तर त्यांनी जरुर जेलस व्हावं आणि सकारात्मकतेने आपला चांगल्या अर्थाने फायदा करुन घ्यावा.. मीरा समीर.. सागर मीरा .. सागर राधा अशा जोड्या( बियॉन्ड सेस्क ) अजरामर करणारी मी मला कायमच माझ्या मित्रांच्या संसारात आयडॉल बनुन राहायला आवडेल.. जसा माझा संसार उत्तम आहे तसाच इतरांचाही करायला आवडेल म्हणुन लग्नानंतर सुध्दा वैचारिक , समजदार मित्र मैत्रीण आपल्या आयुष्यात हवेत..
माझी बियॉन्ड सेक्स ही कादंबरी ह्याच विषयावर आहे.. ज्यानी वाचली नसेल त्यांनी जरूर वाचा..रोहन , संगीता खुप खुप आभार..

 

सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *