मुखेड: (दादाराव आगलावे )
येथून जवळच असलेल्या श्री संत नामदेव महाराज सार्वजनिक वाचनालय पांडुर्णीच्या वतीने नीट परीक्षेत भरगोस यश संपादन केलेल्या तीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पांडुर्णी येथील भूमिपुत्र कुमारी ऋतुजा प्रल्हाद सूर्यवंशी (611), सुरज आनंदराव सूर्यवंशी(597), मंगेश रामदास सूर्यवंशी (510) यांनी नीट परीक्षेत भरघोष यश संपादन करून वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे श्री गुरु नामदेव महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. चेअरमन व्यंकटराव लोहबंदे, वाचनालयाचे अध्यक्ष दादाराव पाटील सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीराम पाटील पांडुर्णीकर, उपसरपंच निळकंठराव माली पाटील, वाचनालयाचे सचिव तथा मुख्याध्यापक मनोहर सूर्यवंशी, राहुल लोहबंदे, माजी उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, डॉ. भगवान पांडुर्णीकर, डॉ. दिनेश सूर्यवंशी, प्रभाकर कागदेवाड, परबतराव सूर्यवंशी, नामदेव अंभोरे, सौरभ सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी यांनीही यशस्वी त्यांचे अभिनंदन केले आहे पाडणे गावातील या तीनही विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन ये संपादन केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे