विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज नांदेड दौऱ्यावर : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक

 

नांदेड : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे व संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे आज दिनांक 30 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत . या दौऱ्यात दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख मा.आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांनी संयुक्तरीत्या दिली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेची पुनर्बांधणी सुरू आहे . पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्याची जोरदार तयारी सुरू आहे . या अनुषंगाने नांदेड सह मराठवाड्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी जोरदार सुरू आहे . यासाठीच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे आज दिनांक 30 जून रोजी नांदेड येथे आहेत. यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शनही करणार आहेत. नांदेड येथे दुपारी 4 वा.शासकीय विश्रामगृह येथे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील शिवसेनेचे आजी – माजी पदाधिकारी, युवा सेनेचे आजी- माजी पदाधिकारी , महिला आघाडी, युवती सेना आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांनी केले आहे. दरम्यान बैठकीनंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत यासाठी शासकीय विश्राम गृह येथे दुपारी 4 वा.पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . या पत्रकार परिषदेला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुखांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *