नव्या जगाची मुले या बाल कविता संग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहिर

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

येथील प्रतिथयश बालसाहित्यीक मुरहारी कराड पारकर यांच्या नव्या जगाची मुले या बाल कविता संग्रहास सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा … स्व . दामू वासनकर राज्य स्तरीय सूर्योदय बालसाहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे . नुकतेच मंडळाचे अध्यक्ष मा . श्री . सतिशदादा जैन यांनी कळवले आहे . सदरील पुस्तकास राज्यस्तरीय हा पाचवा पुरस्कार असून या पुरस्काराचे वितरण दुसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे . रोख रक्कम व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याबद्दल बालसाहित्यीक मुरहारी कराड यांचे शिक्षण आणि साहित्य क्षेत्रांतून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *