शालेय कर्मचारी पतसंस्था सिडको ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 नांदेड ; कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे सिडको वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्था सिडको ची वार्षिक सर्वसाधारण सभा व याच शाळेतील शिक्षक मनमिळावू, कुणालाही नाराज न करणारे आदरणीय श्री आनंदा जनार्दन हिवराळे यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथमतः पतसंस्थेच्या कामकाजा विषयी, आजच्या सभेचे अध्यक्ष या पतसंस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्रीमान व्ही.डी.बिरादार यांनी भूषविले. प्रथम लक्ष्मी मातेच्या फोटोचे पूजन करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम या पतसंस्थेचे सचिव श्री संजय सूर्यवंशी यांनी पतसंस्थेचा लेखा – जोखा विस्तृतपणे मांडले. त्यानंतर श्री व्ही.डी.बिरादार यांनी पतसंस्थेचा भूतकाळ, वर्तमान काळ यांच्यातील फरक सभासदास वर मांडले. आणि भविष्यकाळाची चिंता व्यक्त केली.हिवराळे सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. या पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान बालाजी मटकमवाड यांनी भविष्यात होणारे फायदे तोटे समजावून सांगून सर्व शाळेतील मुख्याध्यापक लिपिकांचे आभार व्यक्त करून समारोप केले. श्री इप्पर सरांनी सेवापूर्ती नंतर आरोग्य अबाधित ठेवून विथ भ्रमण करीत राहावे. असा मोलाचा सल्ला देऊन शुभेच्छा दिल्या.श्री gavane सरांनीही 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *