ना.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत डॉ.शेंगुलवार स्वगृही परतले

आ.राजुरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश; 
भाजपाला अखेरचा जय श्री राम

नांदेड-

कुंडवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉ.सायन्ना शेंगुलवार आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपाला जय श्री राम करत राज्याचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत. विधानपरिषदेतील कॉग्रेसचे प्रतोद आ.अमरनाथ राजुरकर यांच्या उपस्थितीत त्यांचा कॉग्रेस पक्ष  प्रवेश सोहळा आज येेथे संपन्न झाला.

डॉ.सायन्ना शेंगुलवार यांची कुंडलवाडी शहर व परिसरावर मोठी पकड आहे. एक जनाधार असलेला उच्च विद्याविभुषित राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख आहे. काँग्रेस पक्षात असतांना त्यांनी कुंडलवाडीचे नगराध्यक्षपद भुषविले होते. दरम्यानच्या काळात कांही स्थानिक कारणामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

परंतु भाजपासारख्या धर्मांध व जातंध पक्षात ते फार काळ रमले नाहीत. जिल्ह्याच्या विकासाचे कांहीही देणे घेणे नसलेल्या व भरकटलेल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी शहराचा विकास होऊ शकत नाही.

याची त्यांना दरम्यानच्या काळात खात्री पटली. त्यामुळे त्यांनी भाजपाला अखेरचा जय श्री राम केला व काँग्रेस पक्षात प्रवेश केला.विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ.अमरनाथ राजुरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. 

यावेळी बिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, मनपाचे सभागृह नेते सरदार विरेंदसिंघ गाडीवाले, नगरसेवक विजय येवनकर, मजुर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, कुंडलवाडी चे नगरसेवक शेख मुख्त्यार, माजी नगरसेवक राजु पोतनकर,  शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर, भीम पोतनकर आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *