एकनाथ पवार च्या तीन वर्षाच्या परिश्रमाला भाजपा च्या जुन्या फळीचा बूस्टर डोस..

 

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

कंधार-लोहा मतदारसंघात येणाऱ्या काळात एक नवीन चेहरा येणार असल्याची चर्चा खेडोपाडी चालू असून गावागावात भेटीगाठी चे सत्र सुरू ठेवत जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व हितगुज साधण्यासाठी एकनाथ पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत गेली तीन वर्षांपासून परिश्रम घेत असतांनाच आज फुलवळ येथील श्री क्षेत्र महादेव मंदिर देवस्थान येथे भाजपा च्या जुन्या कार्यकर्त्यांची विशेष बैठक पार पडली आणि याचे फलित म्हणजे येणाऱ्या काळासाठी एकनाथ पवार यांच्यासाठी ही जुनिजाणती भाजपाची फळी ही नक्कीच बूस्टर ठरणार असेच चित्र स्पष्ट झाले.

कंधार-लोहा मतदारसंघात आजपर्यंत केवळ घराणेशाहीच चालत आली असून या मतदारसंघात अशा घराणेशाहीला शह देण्यासाठी कोणी नवीन चेहरा जनतेसमोर येत नव्हता परंतु आता मात्र एकनाथ पवार यांच्या माध्यमातून एक खंबीर आणि गेली ३५ वर्षांपासून भाजपाशी एकनिष्ठ असणारा तसेच आपल्या पक्षात वरिष्ठ पातळीवर सर्वांसोबतच सलोख्याचे संबंध असणारा व्यक्त गेली तीन वर्षांपासून या मतदारसंघात काही तरी बदल करावा आणि तो आपण घडवून आणावा यासाठी चक्क पायाला भिंगरी बसवल्यागत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेच्या भेटीगाठी घेत आपले व्हिजन समजावून सांगत आहेत तसतसा त्यांनी सर्वच स्तरातून प्रतिसादही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे.

याचीच प्रचिती म्हणजे आज ता. ५ जुलै रोजी कंधार-लोहा तालुक्यातील जुन्या फळीतील भाजपा चे अनेक जेष्ठ पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत फुलवळ येथील महादेव मंदिर येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष केरबा सावकार बिडवई , माजी जि.प.सदस्य देविदास महाराज गित्ते , कंधार चे माजी तालुका अध्यक्ष व्यंकटराव गव्हाणे , भाजपाचे अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रा.माधव जाधव , सदाशिव अंबुरे माजी उपसभापती पंचायत समिती लोहा , प्रा. कंठीराम लुंगारे , शिवसांभ देशमुख , अविनाश शितळे , प्रकाश दळवे , दत्ता शेंबाळे भाजपा किसान मोर्चा कार्यकारणी सदस्य , गंगाधर मैलारे , धोंडीबा मंगनाळे , सुभाष गोधने , मारोती गड्डमवार , कोंडीबा बनसोडे , संदीप मंगनाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापले मनोगत व्यक्त करतांना आता आपल्या मतदारसंघाला पर्याय मिळाला असून गेली अनेक वर्षांपासून भाजपाशी एकनिष्ठ असणारे व वेळप्रसंगी सर्वसामान्य माणसाच्या हाकेला साद देणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात एकनाथ पवार च्या रूपाने सामील असून आपण सर्व एकदिलाने त्यांच्या सोबत राहू एकनिष्ठेने काम करून मतदारसंघात भाजपाचा झेंडा फडकवू असा निर्धार सर्वांनी केला असल्याने एकनाथ पवार च्या तीन वर्षाच्या परिश्रमाला भाजपा च्या जुन्या फळीचा बूस्टर डोस मिळाल्याचा दावा सर्वांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *