दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब अवतरले ; चक्क व्यंकटेश गुट्टे याने हुबेहूब साकरली व्यक्तीरेखा !

श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील मातृशाळा श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयात संस्थापक व संचालक, विद्रोही विचारवंत, क्रांतिसूर्य, मन्याड खोर्‍यातील क्रांतिपुरुष, वैचारिक क्रांतिचे आरडीएक्स दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या १०२ व्या जयंती सोहळ्याची सुरुवात वंदेमातरम या राष्ट्रीय गीताने होवून ज्ञात-अज्ञात हुतात्यांना व दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांना आदरांजलि अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सन्माननीय अध्यक्ष मातृमुखी चंद्रप्रभा-केशवसुत,लोहा-कंधार विधानसभा शिवसेना नेते आदरणीय अॅड मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब
यांनी भुषविले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर यांनी केले.कंधारचे पहिले आमदार व स्वातंत्र सैनिक दिवंगत गोविंदराव मोरे यांचे पुत्र डी.जी.मोरे साहेब यांनी डाॅ.भाई मुक्ताईसुताच्या कार्यकतृत्वावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप थोडे नियम बाजुला सारुन डाॅ.शिवाजीराव शिंदे साहेब यांच्या आधी आपले अध्यक्षीय समारोपाचे भाषण सादर केले. तर प्रमुख अतिथी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदीग्राम नगरीतील महिला प्रसुती तज्ञ,सामाजिक कार्यकर्ते मानवता धर्म जपणारे व्यक्तीमत्व, धोंडगे परिवाराचे निकटवर्तीय माऊली हाॅस्पिटल नांदेडचे सर्वेसर्वा डाॅ.शिवाजीरावजी शिंदे साहेब यांनी आपला मौलिक डाॅ.भाई साहेब यांचा सहवास अन् प्रा.चित्राताईवर उपचार करताना आलेला अनुभव अगदी लाईव आपल्या ओजस्वी वाणीतून गुराखीपिठावर व्यक्त करतांना अनेक आठवणींना उजाळा देतांना भावनांना वाट मोकळी करुन दिली.या कार्यक्रमात दहावी व बारावी उर्दु आणि मराठी गुणवंत विद्यार्थ्यांची शर्करातुला मान्यवरांच्या उपस्थितीत करुन गौरविण्यात आले.या कार्यक्रमात संपादक मंडळ कु.श्रृति वाघमारे,कु.प्रतिक्षा मुसळे,कु.अंजली वाघमारे,कु.अनुष्का घाटोळ,कु.सायली पेठकर मार्गदर्शक दत्तात्रय एमेकर गुरुजी, आठवीचे वर्ग शिक्षक प्रकाश पवार सर वर्ग ८ वा अध्यक्ष सेमि यांनी मुक्ताईसुत भित्तिपत्रकाचे संपादन केले.तर जयक्रांति व मायपाठ ही भित्तिपत्रके इयत्ता दहावीचा विद्यार्थी शाहिद शादुल तांबोळी यांनी संपादन केले.त्यास मार्गदर्शन गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी व वर्ग शिक्षक अझर बेग सर या तीनही भित्तिपत्रकाचे उद्घाटन अध्यक्ष अँड मुक्तेश्वरराव भाऊ व प्रमुख मार्गदर्शक डाॅ.शिवाजीराव शिंदे साहेब आणि मान्यवरांच्या समर्थ करण्यात आले!आमच्या श्री शिवाजी हायस्कूल कंधारची रणरागीनी बाल व्याख्याती कु.प्रतिक्षा मुसळे हीने आपल्या रसाळ वाणीतून दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्यावर भाषण करुन उपस्थित श्रोत्यांची मन जिंकली.
१०२ व्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांचे स्वागत इयत्ता आठवी वर्गातील कुमारीकेच्या समर्थ हस्ते ओवाळून औक्षण करुन स्वागत झाले.
__________________________________________
याच कार्यक्रमात प्रमुख आकर्षण म्हणजे आमच्या संस्थेचे व शाळेचे संस्थापक व संचालक दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहंबांची हुबेहूब व्यक्तीरेखा १०२ व्या जयंतीच्या दिनी इयत्ता दहाव्या वर्गातील विद्यार्थी कुमार व्यंकटेश संजयजी गुट्टे याने उत्कृष्ट साकारली.डाॅ.भाई साहेबांची अत्तर लावण्याची अनोखी सवय सोबत घोषणा देणारे शे.का.पक्षाचे खंदे कार्यकर्ते लाल बाबटा हाती घेऊन घोषणा देत गुराखीपिठावर स्वगत साकारण्यासाठी आगमण झाले.या स्वगताचे संकल्पना व लेखन, गोपाळसुत दत्तात्रय एमेकर सर यांनी केली.ही व्यक्तीरेखा साकारताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अशी अनोखी मानवंदना करुन डाॅ.मुक्ताईसुतास जयंतीनिमित्त मानाची कोटी-कोटी जयक्रांति केली.
__________________

 

___________________________
मुक्ताईसूत, जयक्रांति व मायपाठ या तिन्ही भितीपत्रक तयार करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना बक्षीस देवून गौरव करण्यात आला.
दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचे अगदी उमेदीतले कृष्ण-धवल युगातले छायाचित्र पेन्सिल स्केच मधुन साकारणारे बाल चित्रकार रमाकांत भीमराव जोंधळे वर्ग ९ वा आणि डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांची व्यक्तिरेखा साकारणारा विद्यार्थी कुमार व्यंकटेश संजयजी गुट्टे या दोन्ही विद्यार्थ्यांना बक्षीस देवून कौतुक केले.या कार्यक्रमात श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेचे माजी अध्यक्ष जे.टी.लाडेकर साहेब, शालेय समिती अध्यक्षा प्राध्यापिका लिलाताई आंबटवाड, कंधारचे माजी नगराध्यक्ष,स्वातंत्र्य सैनिक रामरावजी पवार साहेब, माजी नगरसेवक शाहूभाऊ नळगे, माजी उपनगराध्यक्ष जफारोद्दीन बाहोद्दिन,माजी उपनगराध्यक्ष मन्नानभाई चौधरी,नारायणराव पटणे,गुरुनाथराव भांगे, शालेय समितीचे सदस्य, पत्रकार अँड हफिज भाई घडविला,राजु डफडे,आत्माराम लाडेकर, माधव भालेराव, मामा गायकवाड, परशूरामजी धोंडगे, माजी प्राचार्य मनोविकास विद्यालयाचे माजी प्राचार्य कंटीराम लंगारे सर,आदीजण उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *