कंधार ; प्रतिनिधी
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे लेखा परीक्षण करण्याबाबत शासनाकडून वेळापत्रक जाहीर झाले होते त्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात लेखापरीक्षण कार्यक्रम चालू आहे . दि १३ जुलै रोजी गट साधन केंद्र येथे कंधार तालुक्यातील सुमारे 268 शाळांचे शालेय पोषण आहाराचे लेखापरीक्षण अभिलेख हे तपासण्यात आली ,.
शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनीच्या मार्फत सदरील लेखापरीक्षण नांदेड जिल्ह्यात दिनांक 10 जुलै ते 18 जुलै या कालावधीमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे लेखापरीक्षण जिल्हा परिषद व खाजगी शाळेमध्ये चालू आहे .
कंधार तालुक्यातील सर्वच खाजगी शाळा व जिल्हा परिषद शाळेनी भरभरून प्रतिसाद दिला व सन 2015 – 2016 ते सन 2019 -2020 या कालावधीतील आपले सर्व शालेय पोषण आहाराचे अभिलेखे तपासून घेतल्याची माहिती कंधारचे शालेय पोषण आहार अधीक्षक सुरेश पाटील जाधव यांनी दिली .
गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार येथील गटसाधन केंद्र येथे सदर लेखा परिक्षण व तपासणी करण्यात आली . यावेळी लेखापरीक्षण करणारे मुख्य अधिकारी गोरख सोनावणे ,स्वप्निल शिंदे , सचिन पोळ , अब्दुल रहेमान यांच्यासह टीमने अभिलेखे तपासणी केली व संबंधित शाळांना मार्गदर्शन केले व सूचना दिल्या . महाराष्ट्र राज्य मान्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने सदर लेखापरीक्षण करणाऱ्या सर्व टीमचे कंधार तालुका अध्यक्ष भास्कर पाटील कळकेकर यांनी आभार मानले .