सरपंचाच्याच कपाशी पिकावर तणनाशक मारून केले कपाशी पिकाचे नुकसान ; कंधार तालुक्यातील फुलवळ येथील घटना…!

 

कंधार ; ॲड.उमर शेख

 

तालुक्यातील फुलवळ येथील सरपंच सौ. विमलबाई नागनाथ मंगनाळे यांच्या गट नं.१६ मध्ये १ हेक्टर २७ आर. क्षेत्रातील जमीनीवर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली होती,

 

सदरच्या कपाशी पिकावर दि.१९ जुलै २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीने तणनाशक या औषधीची द्रव्याची फवारणी करून जोमात आलेल्या कपाशीचे मोठे नुकसान केले आहे.
११जून २०२३रोजी ठिबक सिंचनाचा आधार घेऊन कपाशी पिकाची लागवड करण्यात आली होती,सदर कपाशी पीक हे जोमाने वाढले होते.

 

परंतु हे अज्ञात व्यक्तीच्या नियतीला कदाचित पटले नसावे, म्हणूनच हा खटाटोप करून, जाणीवपूर्वक कपाशी पिकावर तणनाशक औषधी द्राव्य फवारून नुकसान केले आहे त्यामुळे गावच्या विद्यमान सरपंच सौ. विमलबाई नागनाथ मंगनाळे या आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसून येते.
सरपंच सौ. विमलबाई मंगनाळे यांचे पती नागनाथ विठ्ठलराव मंगनाळे हे दि.२० जुलै २०२३ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शेताकडे गेले असता, सदरचे कपाशी पिके सुकून गेल्याचे निदर्शनास आले, ही बाब मंगनाळे यांच्या लक्षात येतात त्यांनी गावातील जाणकार शेतकरी यांना शेतावर नेऊन सदर कपाशीचे पीक हे अचानक कशामुळे सुकले आहे.

 

या विषयी माहिती घेतली असता, सोबत असलेल्या जाणकार शेतकरी व्यक्तीने सांगितले की,कपाशी पिकावर कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने तणनाशक हे औषधी द्रव्य फवारल्यामुळे कपाशी पीक सुकले असल्याचे निदर्शनास आणून दिले.
सदरील कपाशी पिकाचे आज्ञाताने तणनाशक फवारणी करून नुकसान केल्यामुळे अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन, त्या व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, या आशयाचे निवेदन तहसील कार्यालय कंधार ,तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार, व पोलीस स्टेशन कंधार यांना निवेदन देऊन, नुकसान भरपाई मिळण्यात यावी अशी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *