कंधार शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार प्रशासन व लोकप्रतिनिधीचा योगेंद्रसिंह ठाकूर यांनी केला अनोखा निषेध

 

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरातील रस्त्याची झालेली दुरावस्था व प्रशासनाने मंजूर निधी असूनही रस्ता करण्यास लावलेले वेळ झालेली दिरंगाई यामुळे कंधार शहरातील योगेंद्रसिंह ठाकूर हे आज सकाळी 22 जुलै रोजी शासकीय रुग्णालय कंधारच्या समोर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पडले

 

त्यामुळे त्यांच्या हाताला जबर जखम झाली अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाचा व लोकप्रतिनिधीचा निषेध करत ते त्याच ठिकाणी बसून राहिले .

 


निषेधाचा फलक आणि प्रशासन व मतदार संघ याचा विडंबनात्मक आभार मानत त्यांनी आपले अनोख्या आंदोलन केले..
गेल्या अनेक वर्षांपासून कंधारच्या रस्त्याचा प्रश्न रेंगाळला होता नंतर रस्त्याच्या कामाच्या निविदा ही निघाल्या मात कोठे भिजत घोंगडे अडले की कुणास ठाऊक अद्याप रस्त्याच्या कामासाठी लोक प्रतिनिधीन मुहूर्त सापडत नाही .

 

सोशल मीडियातून वेळोवेळी ट्रोल केले जाते परंतू कातडी अडकवलेले प्रशासन गप्पच आहे .

शहरातील योगेंद्रसिंह ठाकूर हे आज सकाळी 22 जुलै रोजी शासकीय रुग्णालय कंधारच्या समोर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पडले त्यामुळे व त्यांचा हात फॅक्चर झाला त्याप्रमाणे दुसरी दुर्घटना होऊ नये यासाठी कंधारकर प्रार्थना करत आहेत .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *