कंधार ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्याचे कृषी अधीक्षक यांची भेट घेऊन कंधार तालुक्यात युरिया खत विना लिंकीचा उपलब्ध करून देण्यात यावा कारण कृषी सेवा दुकानदारकाकडे लिंकीगचा युरीया असल्यामुळे शेतकऱ्यांनचे आर्थिक नुकसान होत आहे.
त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा माजी सैनिक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल असे माजी सैनिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली अशी माहिती माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली .
दोन दिवसापूर्वी कंधार तालुक्यातील काही शेतकऱ्यांनचे फोन आले होते की काही कृषी दुकानदार युरीया खत नाही म्हणत आहेत आणि ज्यांच्या कडे आहे ते लिंकीग वरचा आहे दोन युरीया पोत्यावर ऐक केमीकल ची बाॅटल घ्यावे लागेल किंवा दुसरा सोबत खात घ्यावे लागेल तरच खात देऊ अन्यथा नाही आसे म्हणत आहेत त्या विषयावर माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी यांना बोलले असता त्यांनी सांगितले
की हा प्रकार काही च नसुन लिकींगचा आणि शेतकऱ्यांना चा कुठलाच समंध नाही… तुम्ही कुठललाही खत खरेदी करत असताना कुठलीच बंधने किंवा लिंकींग नाही…
त्या अनुषंगाने माजी सैनिक संघटना पदाधिकारी शहरातील कृषी दुकानदारांची भेट घेऊन चौकशी करुन त्यांना सुचना केल्या आहेत की शेतकऱ्यांनवर कुठलेच बंधन लादु नका तथा शेतकऱ्यांना परेशान करू नका..त्यांना जे पाहीजे ते खत तुमच्या कडे उपलब्ध असल्यास नक्कीच द्या… यापुढे कोणाची तक्रार आल्यास माजी सैनिक संघटना शांत बसणार पण नाही आणि चुकीला मापी पण नाही.. आम्ही कायदेशीर लढाई लढु आसी सुचना माजी सैनिकांनी दिली आहे..
युरीया खत बर्याच दुकानावर उपलब्ध आहे तरी शेतकऱ्यांनी परेशान होवु नये जर कोणता दुकानदार देत नसेल तर तिथुनच माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन करा 7389115038 तुमची समस्या दुर होईल.. असे आवाहन माजी सैनिकांनी केले आहे .