नांदेड : भारताचे माजी गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत चुरशीच्या लढती होत आहेत. महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातून तब्बल 444 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे . गेल्या दोन दिवस झालेल्या 230 मॅचमध्ये चुरशीच्या लढती होऊन अनेकांनी विजयश्री खेचून आणला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री कै. डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन नांदेड जिल्ह्याच्या वतीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे .या स्पर्धेचे उद्घाटन काल पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिनांक २१ आणि २२ रोजी झालेल्या दोन दिवसाच्या स्पर्धेत तब्बल 230 मॅच झाल्या. यात सर्वच लढती चुरशीच्या झाल्या. सिंगल लढतीमध्ये श्रीनिवास हौजी यांनी अनिर्बन भट्टाचार्य त्यांच्यावर 16- 14 ,9 -15 ,15 -9 अशा फरकाने विजय मिळवला . अनुप कवडे नागपूर यांनी आदर्श पाटील वर 15- 10, 14 -16 ,15 -11 असा सरळ विजय मिळवला . जयेश महाजन धुळे यांनी यश तावरे याच्यावर 20- 18 ,15 -8 या सेटमध्ये विजय मिळवला . लव सूर्यवंशी पालघर यांनी सागर देवकते याच्याविरुद्ध 17 -15 ,15 -9 अशा फरकाने विजय मिळवला. दिग्विजय सिंग राजपूत औरंगाबाद यांनी ओमकार याच्याविरुद्ध 15- 5 ,15- 2 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला . चंदन शाहू अमरावती यांनी योगेश गेडाम याच्या विरोधात विजय मिळवला . अक्षर पातुरकर नागपूर यांनी कर्णिक याच्याविरुद्ध 10-15, 16 – 14,15- 13 च्या फरकाने विजय मिळविला आहे .अत्यंत चुरशीच्या लढतीत ऋशभ देशपांडे पुणे याने अर्णव कल्याणकर यांच्या विरोधात 15-1, 15 -3 अशा मोठ्या प्रमाणे विजयश्री खेचून आणला तर गौरव रेगे याने पुण्याच्या विनीत कांबळे विरुद्ध मॅच जिंकली. कृष्णा मजीठिया नाशिक यांनी नागपूरच्या असिथ देसाई विरुद्ध झालेल्या लढतीत 10-15,15-8,15-9 अशा फरकाने विजय मिळवला आहे .प्रणव कांबळे यांनी नाशिकच्या कृष्णा अग्रवाल विरुद्ध 15 -6 ,15 -11 अशा फरकाने विजय प्राप्त केला तर सिंगलच्याच लढतीत वेदांत शिंदे यांनी मित गल्ला यांच्या विरोधात 15- 13, 15 -13 च्या फरकाने विजय मिळवला .हिमांशू हरदेव पुणे यांनी अमरावतीच्या रितेश अनंतवार याला 15- 11 ,10- 15, 15 -13 च्या फरकाने नवीन विजयश्री खेचून आणला .
दुहेरी स्पर्धेमध्ये गौरव रेगे आणि निहार केळकर नागपूर यांच्या जोडीने यवतमाळच्या मोहित असमानी आणि वैष्णव निबूडे याचा 15 -12 ,18 -16 अशा फरकाने पराभव केला .अक्षय राऊत आणि कबीर कंजरकर ठाणे यांनी औरंगाबादच्या निनाद कुलकर्णी आणि सदानंद महाजन यांचा 15 -9, 15-3 अशा फरकाने पराभव केला .हर्षल जानेराव आणि प्रणव शिंदे यांच्या जोडीने सोलापूरच्या हरीश कुलकर्णी आणि रितेश पिंपळनेरकर यांचा 15 -2 ,15 -10 अशा मोठ्या फरकाने पराभव केला . हकिमोद्दिन अन्सारी आणि वासिम शेख पुणे यांनी नागपूरच्या अक्षता आणि सुखी यांचा 15 -2 ,15 -3 अशा मोठ्या फरकाने पराभव केला . आदित्य कांबळे आणि रितेश चंदूगडे कोल्हापूर यांनी पालघरच्या आदित्य पांडे आणि श्रीधर टक्कर यांचा 15- 11, 15- 10 च्या फरकाने पराभव केला .अजिंक्य गाडेकर आणि वेदांत सिद्धेश्वर परभणी आणि उस्मानाबाद यांनी हर्षल महाजन आणि निमिश उगेमुगे यांचा 15 -3, 15 -3 अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. राहुल कने आणि सुयोग लोखंडे कोल्हापूर या जोडीने ठाणे यांनी नागपूरच्या प्रणाम लोखंडे आणि प्रतीक बोडे यांचा 13 -15 ,15-10 आणि 15 -7 अशा सेटमध्ये पराभव केला.
गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या प्रत्येक मॅच मध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या .दिनांक २५ जुलैपर्यंत ह्या लढती सुरू असणार असून 25 जुलै रोजी सकाळी या सामन्याची अंतिम लढत होणार असल्याची माहिती आयोजक तथा बॅडमिंटन असोसिएशन नांदेड जिल्ह्याचे सेक्रेटरी महेश वाकरडकर यांनी दिली आहे.
होत असलेल्या स्पर्धांचे कोच विश्वास देसवंडीकर मुख्य पंच पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र सावडेकर , विजय कोकमठनकर, रवी जूनावर्न नांदेड , अजिंक्य दाते पुणे ,आकांक्षा पांडे पुणे, आदित्य चौगुले पुणे हे पंच म्हणून काम पाहत आहेत तर औरंगाबाद येथे झालेल्या परीक्षेतील परशिक्षणार्थी सहा कोचेही परीक्षण करत आहेत.