सुदामा हा भगवान श्रीकृष्णाचा वर्गमित्र होता.. तो गरीब होता .. त्याच्या बायकोच्या सांगण्यावरुन तो त्याच्या मित्राला म्हणजेच भगवंताला पोहे घेउन आला होता पण तिथे आल्यावर हे पोहे भगवंताला कसे देउ हा त्याला प्रश्न पडला ,भगवंताने ओळखले आणि पोहे त्याच्याकडुन हिसकावुन घेतले आणि म्हटलं , हे पोहे मलाच काय तर संपूर्ण सृष्टीला तृप्त करतील.. भगवान श्रीकृष्ण हे सृष्टीचे मूळ असल्याने झाडाच्या मुळाला पाणी घातले की झाडाला पोचते…कृष्ण या पुस्तकात ही गोष्ट जरुर वाचा..
यावरून मला काहीतरी सांगायचय म्हणुन ही गोष्ट मी नमुद केली.. प्रशांत नावाचे माझे वाचक जे आष्टा सांगली इथे रहातात त्यांनी मला पेन गिफ्ट दिले आणि म्हणाले , मॅम गिफ्ट लहान आहे हा . पण प्रशांत ला माहीत नाही त्यांनी मला काय दिलय.. त्यांनी मला भावना कागदावर उतरायला त्यांचं प्रेमरुपी पेन दिलय.. मला माहीत आहे त्यातील शाई संपली की पेनाचा उपयोग नाही पण माझ्या वाचकाचं प्रेम तर संपणार नाही.. आपण दुसऱ्याला देणं महत्वाचं त्यामुळे प्रशान्त यांनी स्वतःला कुठेही कमी लेखु नये.. आपल्याला जे जे देता येइल ते ते द्यावं..
अजुन एक किस्सा , माझा मित्र मिलींद नेहमी म्हणतो , सोनल , तुझ्यापुढे मी काहीच नाही मग मी त्याला म्हणते , तु स्वतःला कमी का समजतोस , तुझ्याकडे स्वतःला बदलण्याची ताकद आहे जी बऱ्याच जणांकडे नसते.. आणि खरच मी काही गोष्टी सांगितल्या तर तो लगेच स्वतःमधे उतरवतो.. जो माणूस स्वतःला घडवतो तो कधीच लहान नसतो तर तो कायम महान असतो.. समोर असणारी व्यक्ती ही स्त्री आहे की पुरूष , गरीब की श्रीमंत , कुठल्याही जातीधर्माची असेल त्याच्याकडील उत्तम आपल्याला घेता यायलाच हवं आणि त्याने दिलेल्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग करता यायलाच हवा..
सुदामाने आणलेले पोहे खाऊन भगवान सुध्दा तृप्त होतात मग आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत.. माझ्या वाचकांकडुन , ट्रोलर कडुन मी अनेक गोष्टी शिकते.. दोन घास पोह्याच्या बदल्यात भगवंताने सुदामाला महाल दिला मग ट्रोलर चा मला आदरच करायला हवा ना कारण त्यांच्यामुळे मी अजुन पुढे जाणार आहे.. १००० पानी कृष्ण पुस्तक जरुर वाचा ज्यात कृष्णाच्या सुंदर कथा आहेत ज्याने आपले विचार बदलतील..
सोच बदलो.. देश बदलेगा..
सोनल गोडबोले. लेखिका ,,अभिनेत्री