अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे)
जाणीव अस्मितेची साहित्य परिषद म रा आयोजित आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिना निमित्ताने उद्या शुक्रवार दि ०७ नोव्हें २५ रोजी जेष्ठ साहित्यिक देविदासराव वाघमारे लिखित शिळ्या भाकरी या कविता संग्रहाचे प्रकाशन आणि यास जोडूनच निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी ठीक ११ : ०० वाजता सुरुवात होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्राचे संस्थापक अनुरत्न वाघमारे असणार आहेत. जेष्ठ साहित्यिक, माजी प्राचार्य माधवराव जाधव हे उद्घाटन करणार आहेत. साहित्यिक समिक्षक प्रज्ञाधर ढवळे आणि सुप्रसिद्ध कवी प्रा ज्ञानेश्वर गायकवाड कविता संग्रहावर भाष्य करणार आहेत. श्री शिवाजी काॅलेज कंधारचे मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ दिलीप सावंत आणि ग्रामीण कवी नागोराव डोंगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कवयित्री रुपाली वाघरे आणि कवयित्री ज्योती परांजपे या प्रमुख निमंत्रित कवयित्री आहेत.
पांडुरंग कोकूलवार, रणजित गोणारकर, कैलास धुतराज, चंद्रकांत कदम, थोरात बंधू, प्रतिभा पांडे, भाग्यश्री आसोरे, अलका मुगटकर, अंजली हिंगोले, विद्या आळणे, ज्योती पतिंगराव, ज्योती लाभशेटवार, इ नांदेडचे तर नाना गायकवाड, एमेकर दत्तात्रय गोपाळराव, डॉ पांडुरंग पांचाळ, प्रा भगवान आमलापुरे, डॉ ज्ञानेश्वर डाखोरे, डॉ उमेश पुजारी, राहुल जोंधळे, प्रा भारतकुमार वाघमारे, प्रा धनंजय सोनकांबळे, डॉ माधव मोरे, डॉ माधव कुद्रे, जिजाबाई गायकवाड आणि प्रकाश ढवळे इ कंधारचे निमंत्रित कवी आहेत. हे दोन्ही कार्यक्रम सिद्धार्थनगर कंधार येथे पार पडणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

