अनोळखी मयत माणसाची ओळख पटण्यासाठी वजिराबाद पोलीसांनी जारी केली शोध पत्रिका

नांदेड ;


शहरातील नागिन घाट छावणी जवळ एका 40 वर्षीय अनोळखी माणसाने गळफास घेऊन आत्महत्या केली. वजिराबाद पोलीसांनी या माणसाची ओळख व्हावी म्हणून शोध पत्रिका जारी केली आहे.


 दिनांक 31 ऑगस्ट रोजी हरप्रीत सिंघ महेंद्रसिंघ सुकनेवार  यांनी दिलेल्या खबरे नुसार नगीना घाट येथील छावणी समोर एका झाडाला गळफास घेऊन एक माणूस मरण पावलेला आहे. हा प्रकार सकाळी साडे आठ वाजता समोर आला.

वजिराबाद पोलीसांनी या संदर्भाने अकस्मात मृत्यू क्रमांक 47/ 2020 दाखल केला आहे .पुढील तपास नाईक पी.डी. शिंदे हे करत आहेत .या अनोळखी मयत माणसासाठी वजिराबाद पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. त्यानुसार मयत अनोळखी माणसाचे वय 40 वर्षे असेल, रंग सावळा आहे. उंची अंदाजे 165 सेमी आहे.

बांधा सडपातळ आहे. दोन्ही पाय सुजलेले आहेत. काळ्या रंगाचा पॅन्ट आणि फिकट रंगाच्या पट्याचा चौकडा शर्ट परिधान केलेला आहे .उजव्या हाताला काळा पटृटा  आहे .वजिराबाद पोलिस निरीक्षक संदीप येवले यांनी जनतेला आव्हान केले आहे की कोणी या वर्णनाच्या माणसाला ओळखत असेल तर त्यांनी त्यांची माहिती पोलीस ठाणे वजीराबाद देते द्यावी.

वजीराबाद चा दूरध्वनी क्रमांक आहे 2462  23 65 00 असा आहे .पोलीस नाईक पी .डी. शिंदे यांचा मोबाईल क्रमांक 74 98 88 34 10 यावर सुद्धा माहिती देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *