पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना दिर्घआयुष्यासाठी रूग्णांना फळे वाटप व गणेशाची आराधना 

 

कंधार – गणेश कुंटेवार – २७/७/२०२३
कंधार – महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून गणेश मंदिरात अभिषेक करून महाआरती करण्यात आले तर ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांना निरोगी व दिर्घआयुष्यासाठी लाभावे म्हणून शिवेवरच्या गणपतीची महापुजा करून आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली.ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास शिवसेना लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेशभाऊ कुंटेवार ,कंधार तालुका संघटक पंडीतराव देवकांबळे,शहरप्रमुख अतुल पापीनवार,किसान सेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख व्यंकट मोरे,आत्माराम पाटील लाडेकर,सर्कलप्रमुख माधव लुंगारे,धोंडीबा बिंगेवाड यांच्या सह अनेक शिवसैनिकांनी उपस्थिती दिली होती.यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.टोम्पे,परिचारीका,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *