कंधार ; प्रतिनिधी
माजी सैनिक संघटनेच्या वतीने 26 जुलै रोजी कारगील विजयी दिवसी मेडल लावुन कंधारच्या रस्त्यावर पाण्याच्या खड्यात बसुन आंदोलन करण्यात आले होते , शहरातील रस्त्यांचे काम 28 जुलै पर्यंत सुरु करावे अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा अल्टीमेटम प्रशासनाला देण्यात आला होता त्यांची दखल घेऊन आज दि २८ जुलै रोजी मुहर्त जुळवत कामाचे नारळ फोडण्यात आले .
त्याबद्दल माजी सैनिक संघटनेच्या वतीने सा बां विभाग प्रशासनाचे आणि लोहा कंधार विधानसभेचे आमदार आदरणीय श्यामसुंदरजी शिंदे , पोलीस प्रशासनाचे आणि विशेष करुन तालुक्यातील सर्व रोखठोक लेखणी बहादर पत्रकार बंधुंचे माजी सैनिक संघटनेच्या वतीने जाहीर आभार मानतो अशी प्रतिक्रिया माजी सैनिक संघटणा जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली .