आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कंधार शहरातील 10 कोटीच्या नवीन चौपद्रिकरण सीसी रस्त्याचे उद्घाटन

कंधार; प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासून ऐतिहासिक शहर असलेल्या कंधार शहरातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता असलेला महाराणा प्रताप सिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या 10 कोटी रुपये कामाच्या नवीन चौपद्रीकरण सी.सी. रस्त्याचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन शुक्रवार दि. 28 जुलै रोजी करण्यात आले,

 

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे उपस्थित होते, याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चोंडे, लोहा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, माजी नगराध्यक्ष हमीमोदीन मोईनसाब , खांबेगावचे सरपंच संदीप पाटील , पौळ‌ ,सोन मांजरीचे सरपंच सखाराम पाटील लोंढे, खाबेगावचे सरपंच दुलेखा पठाण, सिद्धू पाटील वडजे, खरेदी विक्री संचालक सुधाकर पाटील सातपुते, लक्ष्मणराव शेळके ,शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाई, राम पा. गोरे,शेख आरिष भाई,नवनाथ बनसोडे,एजाज भोसीकर, गिरीश मामडे, सद्दाम कंधारी, उपसरपंच अशोक बोधगिरे, ,नागेश गोधने,विश्वंभर बसवंदे, लोहा तालुका अध्यक्ष नागेश खांबेगावकर उपस्थित होते,

 

 

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने ऐतिहासिक कंधार शहरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराणा प्रताप सिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतच्या नवीन सी.सी रस्त्याला आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, हा शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली होती,आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अथक पुढाकारातून शहरातील या मुख्य रस्त्यासाठी व शहरातील अंतर्गत सर्व रस्त्यांसाठी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. या नवीन मुख्य रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्याने कंधार शहरवासीयांना दर्जेदार सीसी रस्ता लवकरच दळणवळणासाठी उपलब्ध होणार आहे, या 10 कोटी रुपयाच्या नवीन सी.सी रस्ता उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, लोहा कंधार मतदार संघाच्या विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासणार नसून कंधार शहरात साडेसहा कोटी रुपयांचा निधी तलाठी व मंडळ अधिकारी निवासस्थानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे व 25 कोटी रुपयांचा निधी जाधव हॉस्पिटल ते लॉ कॉलेज चौपदरीकरण रस्त्यासाठी मंजुर करण्यात आलेला आहे, मतदारसंघातील मायबाप जनतेने मला निवडून दिलेले आहे त्यामुळे माझे कर्तव्य आहे की मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करणे, येणाऱ्या काळात बचत गट महिला सक्षमीकरण, सिंचन, शिक्षण, आरोग्य, रस्ते यासह इतर मूलभूत विकास कामातून लोहा कंधार मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *