ओंकार लव्हेकर यांचा पुणे येथे दैनिक चालू वार्ताच्या वर्धापनदिनी उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार ;दैनिक चालू वार्ता चे मराठवाडा उपसंपादक म्हणून यशस्वी कामगिरी

नांदेड – प्रतिनिधी
दैनिक चालू वार्ता चे मराठवाडा उपसंपादक ओंकार लव्हेकर यांचा पुणे येथे दैनिक चालू वार्ताच्या वर्धापनदिनी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स हॉल टिळक रोड स्वारगेट चौक पुणे येथील आयोजित भव्य कार्यक्रमात शाल, पुष्पहार व ट्रॉफी देऊन शानदार सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक डी. एस.लोखंडे पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रशांत जगताप (मा. महापौर व राष्ट्रवादी शहराध्यक्ष पुणे), , मा. संदीप खर्डेकर (प्रवक्ता, भाजप महाराष्ट्र प्रदेश)प्रशांत गांधी(चिटणीस राष्ट्रवादी पुणे शहर) हे व्यासपीठावर उपस्थित होते.

ओंकार लव्हेकर हे गेल्या तीस वर्षापासून त्यांना पत्रकारिकेचा अनुभव आहे. ते एक उत्कृष्ट कथाकार, कवी, लेखक, नाट्य कलाकार, उत्कृष्ट वक्ता, तर उत्कृष्ट लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी दैनिक चालू वार्ता मध्ये मण्याडीचा हिरा व स्वर कोकिळाचा , अन् गंध सुखाचा हे सदरही सतत चालू आहेत. व व उत्कृष्ट वृत्त संकलनाचे कार्य केल्याबद्दल त्यांना या विशेष सन्मानाने गौरवण्यात आले आहे.
तर त्यांच्या या यशाबद्दल दैनिक चालू वार्ता चे मुख्य संपादक डी .एस. लोखंडे पाटील तसेच सर्व टीम तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *