नांदेड ;
गुरुवार 3 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 224 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 443 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 128 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 315 बाधित आले. आजच्या एकुण 1 हजार 809 अहवालापैकी 1 हजार 297 अहवाल निगेटिव्ह आले.
जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 7 हजार 850 एवढी झाली असून यातील 5 हजार 1 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 66.28 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 544 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 246 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. या अहवालात मृत्त पावलेले व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत.
मंगळवार 1 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात बोरबन परिसरातील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, बुधवार 2 सप्टेंबर रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे किनवट येथील 70 वर्षाची एक महिला, जुना मोंढा नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष, अक्सा कॉलनी येथील 45 वर्षाचा एक पुरुष, खाजगी रुग्णालयात गोकुळनगर येथील 75 वर्षाचा एक पुरुष, बोधडी किनवट येथील 47 वर्षाची एक महिला, हैद्राबाद येथील संदर्भीत 70 वर्षाचा लोहा येथील एक पुरुषाचा तर गुरुवार 3 सप्टेंबर रोजी खाजगी रुग्णालयात कंधार तालुक्यातील औराळ येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा मृत्तांमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 251 झाली आहे. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 2, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 9, मुखेड कोविड केंअर सेंटर 28, हदगाव कोविड केंअर सेंटर 10, लोहा कोविड केंअर सेंटर 7, देगलूर कोविड केंअर सेंटर 6, भोकर कोविड केंअर सेंटर 6, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर 133, खाजगी रुग्णालय 11, किनवट कोविड केंअर सेंटर 6, मुदखेड कोविड केंअर सेंटर 3, बिलोली कोविड केंअर सेंटर 3 असे 224 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे
नांदेड मनपाक्षेत्र 52, किनवट तालुक्यात 7, भोकर 2, लोहा 25, नायगाव 1, कंधार 6, माहूर 1, यवतमाळ 2, मुंबई 1, नांदेड ग्रामीण 6, अर्धापूर 1, हदगाव 12, देगलूर 1, मुखेड 5, हिंगोली 3, लातूर 1, परभणी 2 असे एकुण 128 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र, 186, अर्धापूर तालुक्यात 09, भोकर तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 13, किनवट तालुक्यात 7, नायगाव 4, देगलूर तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 8, हिमायतनगर 1, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 18, मुदखेड 13, बिलोली 12, लोहा 12, कंधार 4, हदगाव 2, माहूर 9, उमरी 4, परभणी 4 असे एकुण 315 बाधित आढळले जिल्ह्यात 2 हजार 544 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.
यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 248, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1075, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 77, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 41, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 82, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 103, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 62, लोहा कोविड केअर सेंटर येथे 122, हदगाव कोविड केअर सेंटर 53, भोकर कोविड केअर सेंटर 19,
कंधार कोविड केअर सेंटर येथे 31, किनवट कोविड केअर सेंटर येथे 93, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 32, मुदखेड कोविड केअर सेटर 32, माहूर कोविड केअर सेंटर येथे 48, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 38, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 63, उमरी कोविड केअर सेंटर 47, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 5, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 244 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित संदर्भित झाले आहेत.
✔️जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती☑️घेतलेले स्वॅब- 51 हजार 464,☑️निगेटिव्ह स्वॅब- 41 हजार 427,☑️आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 443,☑️एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 7 हजार 850,☑️आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15,☑️आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 10,☑️एकूण मृत्यू संख्या- 251,☑️एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 1,☑️रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 544,☑️आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 503, ☑️आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 246.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.