नांदेड –
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असलेल्या प्राथमिकच्या १६, माध्यमिक संवर्गातील ११ तर विशेष शिक्षकांमधून १ अशा एकूण २८ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता निवड समितीने या पुरस्काराची निवड केली आहे.
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या प्राथमिक शिक्षकांत दिग्रसकर विकास उद्ववराव (जि.प.प्रा.शा. विष्णूपुरी ता. नांदेड), दादजवार केशव बालाजी(कें.प्रा.शा. पिंपळगाव म.ता. अर्धापूर), पद्माकर प्रल्हाद कुलकर्णी (जि.प.हा. माळकौठा ता. मुदखेड), हात्ते सदाशिव गणेश ( जि.प.हा. काटकळंबा ता. कंधार), पवार रमेश शिवाजी (जि.प.प्रा.शा.बोरगाव आ.ता. लोहा ), पाटील भागवत हणमंतराव ( जि.प.प्रा.शा. बेरळी खु. ता. मुखेड), कदम गणेश ज्ञानोबा (जि.प.प्रा.शा. टाकळी वडग ता. देगलूर), नायटे मन्मथकृष्ण दिगंबर (जि.प.प्रा.शा. गागलेगाव ता. बिलोली), चिंतावार नागोराव राजन्ना (जि.प.प्रा.शा. धानोरा तम ता. नायगाव),
सायबलु साईनाथ भूमन्ना (जि.प.कें.प्रा.शा. बाळापूर ता. धर्माबाद ), देशमुख प्रणिता अशोक (जि.प.प्रा.शा. दिवशी खु. ता. भोकर), बेळकोने शंकर पिराजी ( जि.प.प्रा.शा. मंडाळा ता. उमरी), नरवाडे प्रविण बाजीराव (जि.प.प्रा.शा. बाभळी ता. हदगाव), कोकुलवार पांडूरंग विठ्ठलराव (जि.प.प.प्रा.शा. एकंबा ता. हिमायतनगर ), जायभाये शांताराम श्रीरंग ( जि. प. नवीन प्रा.शा. विठ्ठलवाडी ता. किनवट ) जाधव मोहन रामजी ( जि.प.प्रा.शा. गुंडवळ ता. माहूर) यांचा समावेश आहे. ही निवड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक अशी करण्यात आली आहे.
माध्यमिक शिक्षक संवर्गातून जि. प. हा वाघीचे कल्हाळे राजाराम उत्तम, अर्धापूर हायस्कूलचे जमील अहमद मो. खलील अहमद, जिपहा मुलांचे मुखेड येथून मिस्तरी पितांबर श्रावण, तालुका मुदखेड माळकौठाचे बांगाणे पुरभा निवृत्ती, देगलूर तालुक्यातील शहापूर हायस्कूलचे डॉ. बरकतउल्ला ख्वाजा नजिमोद्दीन, जिपहा लोहगाव ता. बिलोलीचे कोंडावार शिवाजी भूमन्ना, जिपहा घुंगराळा (नायगांव) येथील इंगळे शंकर वसंतराव, येताळा ता. धर्माबादच्या वडजकर गौसिया नासेर, बेरळीकर राजकुमार पांडूरंग (जिपहा पाळज ता. भोकर), हदगाव जिपहाचे शेख ईरफान शेख अहमद, जाधव मोहन गोबरा (जिपहा मुलांचे किनवट) या ११ शिक्षकांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून विशेष शिक्षकामधून जिपहा बारड ता. मुदखेडचे कुलुपवाड बाबू रामजी यांना स्थान मिळाले आहे.
पाच सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त निवड करण्यात आलेल्या नांदेड जिल्ह्यातील २८ शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रादुर्भावाचा विचार करून आणि योग्य त्या उपाययोजना करुन आयोजित करण्यात यावा अशा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूचना आहेत. जिल्हा परिषदेचेच ३० ते ३५ कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्यामुळे दोन दिवसावर आलेल्या शिक्षक दिनाचे औचित्य कसे काय साधले जाणार याकडे पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे.