शहिद सैनिकांची आपल्या भुमितच अहवेलना ; शहिद संभाजी कदम यांच बलीदान वाया जाणार नाही– माजी सैनिक बालाजी चुकलवाड


लोहा ;

 लोहा येथिल उपजिल्हा रुग्णालयास शहिद संभाजी कदम यांचे नाव द्या या मागणीसाठी गेल्या चार महिन्या पासुन माजी सैनिक बालाजी चुकलवाड हे एकांकी लढा देत आहेत.शहिद संभाजी कदम यांचे नाव द्या या मागणीसाठी मोठी चळवळ निर्माण होईल असे वाटले होते परंतु या मागणीला म्हणावा तसा पाठिंबा मिळत नसुन सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटना गप्प असल्या तरी एक दिवस मोठी चळवळ निर्माण होईल .

मला देशासाठी शहिद होता आले नाही परंतु लोहा येथिल रुग्णालयास एका शहिद सैनिकांचे नाव देण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यत लढा देणार असून आपल्या भुमीतच  देशसेवेसाठी बलीदान देणाऱ्या  विरांची अवहेलना होत असून याची किंमत मोजावी लागणार असल्याचा ठाम निर्णय माजी सैनिक बालाजी चुकुलवाड यांनी घेतला आहे.


       शहिद संभाजी कदम यांना विरमारण आले त्या दिवशी लाखो लोक त्यांच्या आत्यविधीला आले होते व सर्वच हळहळ व्यक्त करत होते.राजकीय नेत्यांनी ही संभाजी कदम यांचे बलिदान वाया जाणार नाही यांच्या कुंटुबाच्या पाठीशी आम्ही ठाम पणे उभे राहण्याचे आश्वासन दिले होते परंतु प्रत्येक्षात मात्र या कुंटुबाला कोणीच आधार दिला नाही.संभाजी कदम यांच्या बलिदानाचा इतिहास हा तरुण समोर राहावा यासाठी त्याची आठवण म्हणून लोहा येथिल उपजिल्हा रुग्णालयास नाव देण्याची मागाणी माजी सैनिक बालाजी चुकलवाड व कंधार येथिल माजी सैनिकांनी केली आहे.

या मागणीला मोठा पाठिंबा मिळेल असे वाटले होते परंतु या मागणीकडे सर्वच राजकीय नेते व सामाजिक संघटनेनी पाठ फिरवली आहे.त्यामुळे या मागणीला म्हणावा तसा पाठिंबा मिळत नाही परंतु बालाजी चुकलवाड हे एकांकी झुंझ देत असुन त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,आरोग्यमंत्री ,जिल्हाधिकारी व संबधीत विभागाला या मागणीचे निवेदन दिले आहे.

     लोहा येथिल रुग्णालयास शहिद संभाजी कदम यांचे नाव देण्याची मागणी झाली असताना घरबड घाईने लोहा नगर पालिकेने आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी गोंविदराव पा.चिखलीकर यांच्या नावाचा ठराव घेतला आहे. विशेष बाब म्हणजे नगर पालीका व रुग्णालयाचा कसलाच संबध नसला तरी गुडघ्याला बांशीग ,उथावळा नवरा या म्हणी प्रमाणे हा ठराव घेतला आहे.रुग्णालयास कोणाचे नाव द्याचे हा निर्णय अरोग्य विभागाच्या अंतर्गत आहे.

लोहा -कंधार मातदार संघातील राजकीय पुढारी नको त्या कारणावरुन प्रताप पा.चिखलीकर यांना विरोध करत आसतात परंतु या संदर्भात मात्र सर्वच जन गप्प बसले आहेत ही मोठी शोकांतीका आहे असेच म्हणावे लागेल.   संभाजी कदम यांचे देशासाठी दिलेले बलीदान वाया जाऊ नये या साठी राजकीय व सामाजिक संटनेने उठाव केल्यास रुग्णालयास शहिद संभाजी कद यांचे नाव देण्यास यश मिळेल .


  संभाजी कदम हे  कोणत्या एका जाती धर्मापुरते मर्यादित नसुन ते देशासाठी शहिद झाले आहेत.त्यामुळे माजी सैनिकांनी उभारलेल्या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहीजे असे अहवान माजी सैनिक बालाजी चुकलवाड यांनी केले असुन मला देशासाठी शहिद होण्याचे भाग्य मिळाले नाही
परंतु लोहा येथिल रुग्णालयास एका शहिदाचे नाव देण्यासाठी मला मरण आले तरी चालेल मी शेवटच्या श्वासापर्यत लढत राहिल आशा ठाम निर्णय माजी सैनिक बालाजी चुकलवाड यांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *