साहित्याचे महामेरू अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

 

मुखेड : स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त, महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व,विचारवंत,साहित्यिक कवी,प्रबोधनकार व समाज सुधारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मुखेड तालुक्यातील खंडगाव येथील समाज बांधवाच्या वतीने आयोजित अभिवादन सोहळ्यात प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तद्नंतर सामाजिक नेते नारायण गायकवाड यांच्या हस्ते लालबावटा ध्वजाचे ध्वजारोहण करुन अभिवादन सोहळा संपन्न झाला.
मुखेड शहरातील नरसी रोड वर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले त्यानंतर लागलीच मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आ.तुषार राठोड यांच्या हस्ते लालबावटा ध्वजाचे ध्वजारोहण करुन अभिवादन सोहळा संपन्न झाला यावेळी आ.तुषार राठोड,व्यंकट लोहबंदे,गौतम काळे,मातंग समाजाचे नेते नारायण गायकवाड,पार्थ गायकवाड,पकंज गायकवाड,संभाजी गोंडाळे,सौरभ गायकवाड, परमेश्वर गायकवाड,शिवाजी काळे यांच्यासह समाज बांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *