धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ होळंबे टी एल अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ मामडगे पी डी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्यावर यथोचित विचार मांडताना प्रा डॉ गजलवार आर के छायाचित्रात दिसत आहेत. छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे