काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा देण्याच्या गुजरातमधील न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती हा निर्णय स्वागतार्ह AshokChavan यांचे Tweet

 

@AshokChavanINC Tweet

भ्रष्टाचारासंदर्भातील विधानावरून काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा देण्याच्या गुजरातमधील न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

 

 

हा निर्णय स्वागतार्ह व ऐतिहासिक आहे. लोकशाहीसाठी काँग्रेससह देशातील अनेक पक्षांनी सुरू केलेल्या लढ्याला या निर्णयामुळे अधिक बळ मिळाले आहे.
गुजरातेतील न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर लोकसभा सचिवालय व निवडणूक आयोगाने तडकाफडकी त्यांची खासदारकी रद्द केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर ते त्याच तत्परतेने राहुलजी गांधी यांची खासदारकी पुनःश्च बहाल करण्यासाठी कार्यवाही करतील, ही अपेक्षा.
#जयहो #सत्यमेवजयते #JanNayakRahulGandhi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *