कंधार ; प्रतिनिधी
कंधार नगर परिषदेच्या कंत्राटी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असल्याने कंधार नगर परिषदेचे प्रशासक तथा कंधार तहसीलचे तहसीलदार श्रीराम बोरगावकर यांची आज दि ४ ऑगस्ट रोजी माजी सैनिक शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देण्यात आले.थकीत पगारी त्वरित करा अन्यथा माजी सैनिक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला .
कंधार नगर परिषदेचे कंत्राटी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे 2021 पासून काही महिन्याचे वेतन राहिलेले आहे माजी सैनिक संघटनेने या अगोदर पण पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या विनंती मुळे नगरपरिषद प्रशासनाला विनंती करून या कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी बद्दल बोलून पगारी त्वरित करण्यात यावे अन्यथा माजी सैनिक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला होता , याची दखल घेऊन नगरपरिषदेच्या प्रशासनाने दोन महिन्याचे थकीत वेतन आदर केले होते मागील दोन महिन्यापूर्वी पण हाच प्रकार समोर आला आणि पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे परत थकीत वेतन पेंडिंग ठेवले गेल्याने पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेच्या
मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन पाणी सोडण्याचे काम बंद केले होते . तेव्हा माजी सैनिक संघटनेने पुढाकार घेऊन मध्यस्थी करून थकीत वेतन त्वरित देण्यात यावे म्हणून विनंती केली तेव्हा प्रशासनाने थकीत वेतन दोन महिन्याचे देऊन इथून पुढे थकीत वेतना मधून एक महिन्याची पेमेंट आणि रेगुलर पेमेंट अशी प्रत्येक महिन्याला दोन महिन्याची पेमेंट करून थकीत वेतन पूर्ण अदा करण्यात येईल असा शब्द दिला होता पण हा शब्द न पाळल्यामुळे परत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी दिनांक 4 ऑगस्ट 2023 पासून काम बंद पुकारले आहे आणि त्याची एक प्रत माजी सैनिक संघटनेला देण्यात आली त्याचा संदर्भ देऊन आज माननीय तहसीलदार तथा प्रशासक यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे .
9 ऑगस्ट 2023 पर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्ण करा अन्यथा 10 ऑगस्ट दोन 2023 हजार तेवीस रोजी आपल्या कार्यालयाच्या समोर माजी सैनिकांच्या वतीने बेमुद्दत उपोषण करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी माहिती माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली . यावेळी माजी सैनिक पोचिराम वाघमारे , माजी सैनिक पंदीलवाड यांची उपस्थिती होती .