संकुल गोलेगाव ची पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोलेगाव(प.क.) येथे संपन्न

 

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोलेगाव येथे दि. 01.08.2023 रोजी केंद्र गोलेगाव अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रातील माहे जुलै – 2023 ची पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संकुलाचे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय श्री पाराजी पोले सर यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्री.आनंदराव गारोळे, तथा जि प प्रा शाळा हाडोळी चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री दावलबाजे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.

शिक्षण परिषदेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. जि प के प्रा शा गोलेगाव शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर मेरे प्यारे वतन हे देशभक्तीपर गीत अतिशय सुंदर नृत्य करून सादर केले.

यावर्षी गोलेगाव संकुलातून बदली करून गेलेल्या सौ कुमठेकर मॅडम , श्री झुंबाड सरचा सहपत्नीक त्यांच्या पत्नीआणिता दाणे मॕडम यांना शाल, श्रीफळ, व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. कुमठेकर मॕडमने ,जुंबाड सर व आणिता दाणे मॕडनेआपले मनोगत व्यक्त तसेच गोलेगाव संकुलात बदलीने आलेले श्री चव्हाण सर,श्री केंद्रे सर व श्री भोस्कर सर यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.

 

शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक संकुलाचे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय श्री पाराजी पोले सर यांनी केले. प्रस्ताविकात त्यांनी आज होणाऱ्या सर्व विषयांवर प्रकाश टाकला.
त्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड यांनी शिक्षण परिषदेसाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष तासिकेला सुरुवात झाली. पहिल्या तासिकेत सुलभक श्री कंधारे सर यांनी FLN, अध्ययन स्तर निश्चिती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या तासिकेतश्री भागानरे सरने विद्याप्रवेश बाबत सविस्तर मार्गदर्शन केले,तिसऱ्या तासिकेत श्री संतोष जोशी सरने बदललेल्या क्रमिक पाठ्यपुस्तका बदल सविस्तर उब्दोधन केले.मध्यंतरी नंतर श्री बोधनकर सर यांनी v school app सर्व शिक्षकांना डाऊन लोड करून दिले व सविस्तर मार्गदर्शन केले. श्री लोंड सर यांनी सेतू अभ्यासाबदल मार्गदर्शन केले.*
*श्री गव्हाणे सर जि प के प्रा शा गोलेगाव,श्री तुतूरवाड सर जि प प्रा शा हाडोळी व श्री शिरोळे सर जि प प्रा शा किरोडा यांनी त्यांच्या100% प्रगत वर्गाची यशोगाथा सांगितली.*
*केंद्रप्रमुख मा. पाराजी पोले सर यांनी शैक्षणिक व प्रशासकीय कामांचा आढावा घेतला.*
*कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री राम माने यांनी तर आभार प्रदर्शन श्री वामन केंद्रे यांनी केले.*
*शेवटी सर्वांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला व परिषदेची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री किरण गव्हाणे, सौ लुंगारे मॅडम, श्री राम माने सर, श्री संतोष लोंड, श्री ओमकार बोधनकर, सौ. संगीताबाई डांगे शापोआ स्वंयपाकी व श्रीमती रुक्‍मीनबाई केंद्रे शापोआ मदतनीस यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *