दुर्देवी निराधार महिलेस मदतीची गरज मदत करण्याचे आवाहन

 

(कंधार)
कहाणी आहे नियतीच्या एका दुर्देवी महिलेची तीच नाव आहे गंगाबाई नामदेव कांबळे ही महिला अत्यंत हलाकीच जगणं जगतिय ना मुलबाळ ना कोणी सोयरा ती आहे निराधार त्यामुळं तिने मदत मागण्यासाठी वाचा फोडली आहे. तिला गरज आहे तुमच्या आमच्या सारख्या मदतगाराची गंगाबाई ही मुळची कंधार येथील आहे ती बौद्ध द्वार येथे किरायाने वास्तव्यास आहे.हाती लागलेलं काम करून ती स्वतःच्या पोटाची खळगी भरायची कधी नगर परिषदेत कंत्राटी कामगार म्हणुन तर कधी रोजंदारीने पण ते ही नियातीला मान्य नाही गंगाबाईला हृदय विकाराचा आजार दडला आणि डॉक्टरांनी तिला ओझ न उचलण्याचा सल्ला दिला तेव्हां पासुन ती घरी बसुन शेजारील महिलांना स्वयंपाक मागायची आजू बाजूच्या महिला तीला शिजविलेला स्वयंपाक आणूनही द्यायच्या व तीला छोटीसी मदत देखील करायच्या पण तीचा आजार वाढल्यामुळे व तिच्या औषध पाण्याचा खर्च वाढल्यामळे ती घरीच बसुन याचना करत आहे अनेकांना ती औषध उपचारासाठी आर्थिक मदत मागत आहे.

 

निराधार असलेली गंगाबाई हिला सरकारी निराधार मानधन ही मिळत ते पण एक हजार रुपये महिना आणि ते दोन तीन महिन्यां नंतर त्यात तिचा औषध गोळ्यांचा देखील खर्च निघत नाही.अनेकांनी तिला मदत ही केली पण तिचा आजार वाढत चाल्यामुळ तिला औषध उपचारासाठी पुरेशी मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.तिच्याकडे पुरेशे पैसे नसल्यामुळे ती औषध उपचारा पासुन वंचित आहे.असलेल्या गोळ्या – औषध संपल्यामुळे गरज आहे तिला तुमच्यासारख्या मदतगाराची खुल्या हाताने आपल्या पद्धतीने जशी मदत घडेल तशी तिला मदत करावी अशी ती याचना करत आहे.तिला मदत करण्यासाठी आपण तिच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकता त्यासाठी तिचा खाते क्रमांक आहे SBI ACCOUNT NO :- 62409558325
IFSC CODE :- SBIN0020056 आपण समाजाचं काहीतरी देणं लगतोत हा उद्देश डोळ्या समोर ठेऊन तिला मदत सर्वांनी करावी हीच आपेक्षा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *