अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट…! साहित्यकांनी आपल्या लेखणीतून वंचित उपेक्षितांना न्याय द्यावा – साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे प्रतिपादन.

अहमदपूर ; समाजातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस महागाईमुळे अडचणीत सापडल्याचे सांगून त्यांच्या जिवंत व्यथा,पिढीत, उपेक्षित, वंचितांना न्याय साहित्यकाने आपल्या लेखणच्या माध्यमातून मिळवून द्या. अमळनेर येथे होऊ घातलेल्या 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.

ते चार रोजी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयास सदिच्छा भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मसाप चे अध्यक्ष सत्यनारायण काळे, कार्यवाह प्रा.द मा माने,कवी राजेसाहेब कदम,कोषाध्यक्ष महेंद्र खंडागळे, संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना प्रा. डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले की, आज सर्व सामान्य नागरिक अडचणीत असून सद्यस्थितीला मुलांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, जमीनदारांचे प्रश्न, शोषित पीडितां सह अनेकांचे प्रश्न असून मी जे भोगले, जगले,सोसले तेच मी माझ्या साहित्यातून अग्रक्रमाने मांडले असे सांगितले. अंधश्रद्धा ठेवू नका, विज्ञाननिष्ट होऊन वाचन, चिंतन,मनन करून जीवन फुलवावेअसे जाहीर आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निसर्ग कवी ना धो महानोर यांना अभिवादन करण्यात आले .
नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे व त्यांच्या पत्नी प्रा. सौ अरुणा शोभणे या शहरांमध्ये प्रथमच आल्यामुळे त्यांचा मसाप च्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि फेटा बांधून त्यांचा शाखेच्या वतीने अध्यक्ष सत्यनारायण काळे सौ विमलताई काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन राम तत्तापूरे यांनी तर आभार प्रा. द मा माने यांनी मांनले. अध्यक्षीय समारोप सत्यनारायण काळे यांच्या भाषणाने झाला.
या सोहळ्याला अनिसचे प्रमुख हरिदास तम्मेवार, एडवोकेट जुगल किशोर शाबू, सौ ललिता शाबू, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या आशा रोडगे, एडवोकेट ज्योती काळे, रामनिवास भुतडा, राजनारायण काळे यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, शिक्षक, प्रा. व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसापच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *