कंधार येथे मंडल आयोग स्थापना दिवस मिठाई वाटप करून साजरा

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथे मंडल आयोग स्थापना दिवस मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी रामचंद्र येईलवाड व अंगद केंद्रे , ओबीसीतील प्रमुख मंडळी उपस्थित होती.

 

ओबीसी समाजाचा हक्कासाठी सन्मान सप्ताह साजरा करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांचे कंधार येथे पञकार परिषदेत आवाहन दिनांक ०७ ते १३ ऑगस्ट ओ.ब.सी. सन्मान सप्ताह साठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते .

 

ओ.बी.सी. अहवान करीत असताना ०७ ऑगष्ट हा दिवस ख-या अर्थाने ओ.बी.सी. च्या स्वातंत्र्याचा दिवस होय. ओबीसी समाजाचा हक्क हिसकावून घेण्याचा घाट घातल्या जात आहे.ओबीसी समाजाने जागृत होणे काळाची गरज.
दिनांक ०७ ते १३ ऑगस्ट ओ.ब.सी. सन्मान सप्ताह साजरा करण्याचे अहवान रामचंद्र येईलवाड.

७ ऑगस्ट हा दिवस ओबीसी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा असल्याने कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखर वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी अंगद केंद्रे , रामचंद्र येईलवाड व ओबीसीतील प्रमुख मंडळी उपस्थित होती.
.

दिनांक ०७ ऑगष्ट १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय विश्वनाथ प्रतापसिंग (व्ही.पी.सिंग) यांनी मा. बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या नेतृत्वात ओबीसी साठी नेमलेले कमीशन म्हणजे मंडल कमीशन यांच्या शिफारसी लागु केल्या आणि म्हणुन ५२% ओबीसींना २७% आरक्षन का होईना मिळाले व त्याचा परिणाम म्हणुन ओबीसीच्या अनेक छोटया मोठया घटकांना ग्राम पंचायत, नगर पालिका, महानगर पालिका, पंचायत समीती, जिल्हा परिषद चे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली व शिक्षण आणि नौकरी लाभ मिळाले. तो आज हिसकावुन घेण्याचा घाट घातल्या जात आहे. संख्येने ५२% असणारा ओबीसी बांधव स्वातंत्र्या नंतर ४० ते ४२ वर्षा नंतर स्वतंत्र झाला कारण आमचा ओबीसी समाज जागृत नसल्याचा तो परिणाम आहे. आपण जागृत असतो तर अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रमाणे १९५० पासुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेतील कलम ३४० नुसार ओबीसी बांधवांना लोकसभेत आणि विधानसभेत सुध्दा ओबीसींना संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले असते. नॉन क्रिमेलियर ची आट लागु झाली नसती आणि दर दहा वर्षाला ओबीसी ची जनगणना झाली असती आणि आम्हाला तो आकडा कळला असता. आणि ओबीसी वरचा अन्याय थांबला असता. त्यामुळे ओबीसी बांधवांनो आता तात्काळ जागे व्हा. घटनेतील ३४० कलम नुसार आपले हक्क आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी संघटित व्हा असे आवाहन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *