काही मित्रांना मी त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आवडणार नाही पण मनापासून लिहावं वाटतय.. सगळ्यात आधी भगवंत यासारखा सखा दुसरा असूच शकत नाही.त्यानंतर नवरोबा ज्याने मला स्वातंत्र्य दिलं आणि मी भरारी घेउ शकले..
गेल्याच आठवड्यात ओळख झालेला मित्र म्हणजे राजेश सहस्त्रबुद्धे , ती भेट म्हणजे भगवंताच्या जवळ घेउन जाणारी होती.. मी शेगाव ला जायची इच्छा व्यक्त केली तर ते म्हणाले , मला तुम्हाला न्यायला आवडेल..खुप छान व्यक्तीमत्व आयुष्यात आलं.. एका मित्राने माझ्या नावाने रीकरींग काढलय.. मिलींदने काल पेनाला मोरपीस लावुन युनीक गिफ्ट दिलय.. अनिल ने तृतीयपंथीच्या फॅशन शो वेळी जी मदत केलेय ती विसरुच शकत नाही.. एका मित्रामुळे मी बियॉन्ड सेक्स लिहु शकले.. मिलिंद मराठे सर कधीही रात्री अपरात्री उपयोगी येणारा मित्र.. सोनल तुला कधीही कितीही पैसे लागले तर माग म्हणणारा माझा अजुन एक मित्र.. अमोल ( फोटोग्राफर ) कितीही आणि कधीही आवडीने फोटो काढुन देतो.. शॉपींग करुन देणारे तर अनेक आहेत.. किती जणांची नावं लिहु.. फिरायला न्यायला सुध्दा अनेक जण आहेत.. मला आयुष्य कमी पडेल इतकी मोठी लिस्ट आहे.. सुहास ने मुलाखत घेउन माझ्या पुस्तकाचा खप वाढवला.. माझा प्रत्येक वाचक ज्याने माझ्या पुस्तकावर लिहुन त्यांनीच मला मोठं केलं.. माझा प्रत्येक चाहता ज्याने मला जगायला शिकवलं..आई वडील नातेवाईक आहेतच.. माझ्या भावाने मोठा प्लॉट देउन मला शेतकरी केलं.. जयंतने पुस्तक काढुन अजुन मला लोकांसमोर आणलं.. माझ्या सुंदर दिसण्यात , सुंदर असण्यात निसर्ग , प्राणी , पक्षी यांचा मोलाचा वाटा आहे.. निसर्ग हा आपला उत्तम मित्र असतो.. माझे अनेक गुरु आहेत त्यांची तरआठवण कायम हृदयात असते.. माझे अनेक गृप्स , कालच इतक्या जणानी गराडा घातला होता की भाग्यवान असल्याचा सुखद सोहळा अनुभवला आणि कायमच अनुभवते..
मला माहीत आहे.. प्रत्येकाची नावं लिहु शकत नाही पण हेही तितकच खरं आहे की कोणीही माझ्यावर नाराज होवु शकत नाही.. माझ्या मनात , हृदयात प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.. अनेक मित्र परिवार आहे.. कधीही कोणीही फसवलं नाही.. कोणीही माझा गैरफायदा घेतला नाही.. कोणीही आणि काहीही या जगात वाईट नाही.. प्रत्येकाने मला भरभरुन दिलं .. मी कोणाला कधी काही दिलं असेल तर ते त्यांनी विसरुन जावं आणि जितकं माझ्याकडून घेता येइल तितकं घ्यावं..
सोनल गोडबोले..लेखिका