अशोक चव्हाण यांना काँग्रेस कार्यसमितीवर काम करण्याची संधी मिळाल्या बदल प्रतिक्रिया

काँग्रेस पक्षात सर्वोच्च असलेल्या काँग्रेस कार्यसमितीवर काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष मा.खा. मल्लिकार्जूनजी खरगे, माजी काँग्रेस अध्यक्षा मा.खा. सोनियाजी गांधी, देशाचे आशास्थान मा.खा. राहुलजी गांधी आणि पक्षाचे महासचिव मा.खा. के.सी. वेणुगोपालजी यांचा मनःपूर्वक आभारी आहे.

युवक काँग्रेसपासून पक्षाच्या अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या मला मिळाल्या आहेत आणि प्रत्येक जबाबदारी मी नेहमीच प्रामाणिकतेने व परिश्रमपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस कार्यसमितीचा सदस्य म्हणून देखील मी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविण्यास वचनबद्ध आहे.
काँग्रेस कार्यसमितीत महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते मुकूलजी वासनिक, अविनाश पांडे यांचा समावेश आहे. चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, यशोमतीताई ठाकूर, प्रणितीताई शिंदे यांनाही कार्यसमितीत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यासह समितीतील सर्वांचंच मी अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *