अहमदपूर ; ( प्रतिनिधी प्रा . भगवान आमलापुरे )
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला दहा वर्षे पूर्ण झाली परंतु आजही त्यांचे मारेकरी व त्यामागचे मास्टर माईंड यांचा शोध अद्याप लागला नसून त्यांना शिक्षा झाली नाही. याचा तीव्र संताप शांततामय मार्गाने व्यक्त करत फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर, नरेंद्र दाभोलकर अमर रहे, माणूस मारता येतो विचार मारता येत नाही अशा घोषणा देत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या निर्भय मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली पुढे डॉ. आंबेडकर मार्गे आझाद चौकातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सावरकर चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी पुष्प अर्पण करत शब्दरूपी भावना व्यक्त करत अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे प्रा. गोविंद शेळके, बोधिसत्व फाऊंडेशनचे राजेंद्र कांबळे, शाहू राजे योगा ग्रुप चे एन डी राठोड ,प्रा श्रीरंग खिल्लारे,मच्छिंद्र गोजमे, सुनील खंडाळीकर , प्रा.अनिल कांबळे , अशोक चापटे, उत्तम कांबळे,प्रा बालाजी आचार्य,ह भ प संजय महाराज नागपु्र्णे, मधुकर जोंधळे, भिमराव नाना कदम, मिलिंद कांबळे,गौतम कांबळे,प्रा अरुण महाळंकर,प्रा.भगवान आमलापूरे, सहदेव होनाळे,नागेश लांजे , सिद्धार्थ दापके,प्रा. गुरुनाथ चवळे, अविनाश मंदाडे, उमाकांत पाचंगे, मधुकर मदने, समर्थ लोहकरे, दत्तात्रय कदम,बागण शेख,आहील शेख, सोमनाथ ताडमे, रावसाहेब वाघमारे, राजीव हारगीले,हरिभाऊ गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंनिस चे राज्य निमंत्रक हरिदास तम्मेवार, सुत्रसंचलन प्रधान सचिव बाबासाहेब वाघमारे यांनी तर आभार मनोहर पाटील यांनी मानले.