कंधार ; प्रतिनिधी
ऑल इंडिया मजलिस -ए – इत्तेहादुल मुस्लीमीन एमआयएमच्या लोहा कंधार विधानसभा तालुकाध्यक्ष पदी शेख हब्बू भाई यांची दि २० ऑगस्ट रोजी नांदेड येथे निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष मिर्झा अमजेद बेग यांच्या हस्ते देण्यात आले ,
मराठवाडा अध्यक्ष फरोजखान लाला , शेख अझर , शेख रब्बानी , शेख सुलतान , शेख फेरोज यांनी शुभेच्छा दिल्या .
कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे आज दि .२२ ऑगस्ट रोजी एमआयएमच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी निवडी बद्दल शेख हब्बू भाई याकूब यांचा सत्कार करण्यात आला . लोहा कंधार तालुक्यात संघटनेची ध्येय धोरण घेऊन एमआयएमच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली .
यावेळी हाजी मगदुम , हाजी महमंद हफीज , माजी सैनिक संघटना कंधार तालुका उपध्यक्ष शेख अजीज , अहेमद चौधरी , शेख हबीब , वहीद बेग , सोनू एगडे , शेख आरबाज , इरफान शेख , सदाम खंदारी , शेख आलिमगीर यांची उपस्थिती होती .