कंधार ; प्रतिनिधी
कौठा तालुका कंधार येथील भुमिपुत्र तथा ऊत्कृष्ट गायक श्री हावग्गी उत्तमराव पन्नासे यांना श्री महादेव मठ संस्थान हदगाव यांच्या वतीने श्री सदगुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या द्वितीय श्रावणमास तपोsनुष्ठान सोहळ्यात ष.ब्र.108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न श्री सिद्धलींग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा , तथा मठ संस्थानचे मठाधिपती ष.ब्र.108 श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगाव, ष.ब्र.108 वेदांताचार्य श्री दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर, महंत श्री गोपाळगीर महाराज मठ संस्थान दत्तबर्डी व श्री प.पु.योगीराज बापु हदगाव यांच्या हस्ते तथा किर्तनकार-प्रवचनकार गायक-वादक व हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत कला क्षेत्रातील स्वर शिरोमणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हावग्गी पन्नासे हे जिल्हा कक्ष प्रमुख नांदेड शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा समन्वयक डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा शिवसेना जिल्हा संघटक शिवाजीराव पन्नासे यांचे पुतणे आहेत त्यांना मिळालेल्या स्वर शिरोमणी पुरस्काराबद्दल अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .