कंधार : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण कर्त्यावर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा कंधार सकल मराठा समाजाच्या वतीने २ सप्टेंबर रोजी कंधार येथील मार्केट बंद करून निषेध नोंदवित तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवांच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे उपोषणार्थिंवर लाठीमार झाला. या घटनेचा कंधार शहरात समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करुन कंधार शहरात सर्व दुकाने बंद करून निषेद करण्यात आला.यावेळी एक मराठा लाख मराठा ,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, लाठीचार्ज करणाऱ्या सरकार व गृहमंत्री यांच्या विरोध घोषणाने शहर दणानुन निघाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तसेच झालेल्या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन दोषीवर कडक कार्यवाही करावी. अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. निषेधाचे निवेदन तहसिदर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्री, पोलीस अधीक्षक नांदेड देण्यात आले. यावेळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.