कंधार ; स्वप्नील उल्लेवाड
तालुक्यातील मौ.कंधारेवाडी येथिल स्वर्गीय तुकाराम विश्वनाथ जिंनके यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर रोजी मित्र परीवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान व कै.तुकाराम जिंनके यांच्या नावे सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करुन मित्राला अनोखी श्रद्धांजली वाहीली.
५ सप्टेंबर रोजी सपंन्न झालेल्या रक्तदान शिबीराचे रक्त संकलन कै.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड चे डॉ ,रमेश कोंडलवाचे व त्यांच्या टिमने संकलन केले.यावेळी
मौ.कंधारेवाडी येथिल स्वर्गीय तुकाराम विश्वनाथ जिंनके यांचे ९ अॉगस्ट २०२० रोजी निधन झाले होते.सर्व मित्रांमाध्ये मिसळून राहणाऱ्या तुकाराम यांच्या निधनाने मित्रपरीवारात हळहळ व्यक्त झाली होती.अवघ्या वयाच्या २३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या मित्याचे स्मरण म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर २०२० रोजी वाचनालय व रक्तदान शिबीर आयोजित करुन एक आनोखी श्रद्धांजली मित्र परीवाराने वाहीली.
५ सप्टेंबर रोजी सपंन्न झालेल्या रक्तदान शिबीराचे रक्त संकलन कै.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड चे डॉ ,रमेश कोंडलवाड व त्यांच्या टिमने संकलन केले.यावेळी स्वप्नील उल्लेवाड, नागोराव जिंनके ,सोपान जिंके,माणिक जिंनके ,ओंकार बारोळे,सोमनाथ अमलापुरे ,राजीव कंधारे ,ज्ञानेश्वर श्रीमंगले ,श्याम पुरी ,सिद्धेश पल्लेवाड,कृष्णा कंधारे ,नामदेव कंधारे ,बालाजी बंडेवार,परसराम डिगोळे.सोपान मुंडे,सोपान मोक्कमपल्ले,गजानन गोटमवाड,राजेश लोक्कमपल्ले,केदार पुरी,ज्ञानेश्वर बारोळे,दिनेश कंधारे,राम जक्कलवाड,सरपंच केशव कंधारे ,उपसरपंच गुरुनाथ अमलापुरे,तंटामुक्ती अध्यक्ष ईश्वर कंधारे,आदीसह गावकऱ्यांनी परीश्रम घेतले.